Breaking

ZP health department : दहा वर्षांपासून भांडारातच खितपत पडल्या औषधी!

 

Medicines that have been lying in storage for ten years : अधिकाऱ्याच्या निलंबनानंतर गौडबंगाल उघडकीस, अनेकांचे पाय खोलात?

Wardha जिल्हा आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या औषधी भांडारचे औषधी निर्माण अधिकारी सोज्वळ उघडले यांना निलंबित करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी ही कारवाई केली. त्यानंतर अनेक बाबी पुढे यायला लागल्या आहेत. गेल्या दहा वर्षांपासून भांडारातच औषधी खितपत पडल्या असल्याचेही उघडकीस आले आहे.

एक अधिकारी तीन ते चार वर्षांपेक्षा अधिक काळ एका ठिकाणी राहू शकत नाही. पण, सोज्वळ उघडे तब्बल एका दशकापासून अधिक काळ एकाच पदावर कार्यरत आहेत. आता ऐन सेवानिवृत्तीच्या तोंडावरच त्यांना निलंबित केल्याने अडचणीत भर पडणार आहे.

वर्ध्यातील जाजू वाडी आणि मुख्य डाकघर चौक असे दोन औषधी भांडार आहे. याची जबाबदारी ही औषधी निर्माण अधिकारी साेज्वळ उघडे यांच्याकडे होती. येथून जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय यांना औषधीसह इतर साहित्य पुरवठा केला जातो. त्या औषधीसह साहित्याची खरेदी करणे आणि पुरवठा करणे ही जबाबदारी त्यांच्यावर होती. पण, यावर जिल्हा सनियंत्रण समिती असते, त्यामुळे या समितीच्या अखत्यारित हे सर्व कामकाज चालत असते.

Artificial Intellengence in health sector : AI मशीनने काढले ६८ हजार ६२६ ECG!

इतकेच नाही तर खरेदीपासून तर देयक अदा करण्यापर्यंतचा व्यवहार हा जिल्हा परिषदेच्या विविध विभाग तथा अधिकाऱ्यांच्या टेबलावरून होत असतो. आता निलंबनानंतर या प्रकरणाची विभागीय चौकशी होणार आहे. त्यामुळे चौकशी समिती गठित झाल्यानंतर निलंबित अधिकाऱ्यासाेबतच सनियंत्रण समितीचे सदस्यही चौकशीच्या घेऱ्यात येण्याची शक्यता आहे.

आतापर्यंतच्या कार्यकाळातील अधिकारी व सनियंत्रण समितीतील सदस्य यांचीही अडचण वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणात कुणाचे पाय किती खोलात आहे, याचाही उलगडा झाल्याशिवाय राहणार नाही. वर्ध्याच्या औषधी भांडारचे औषधी निर्माण अधिकारी सोज्वळ उघडे यांचे निलंबन करण्यात आले आहे.

ZP health department : Expiry ला आलेल्या औषधांचा पुरवठा, अधिकारी निलंबित

त्यांना सिंदी (रेल्वे) येथील मुख्यालयी पाठविले आहे. त्यामुळे आता त्यांच्या जागेवर आष्टी तालुक्यातील अंतोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे औषधी निर्माण अधिकारी नीलेश शास्त्री यांची नियुक्ती केली आहे. सध्या मार्च एण्डिंग असल्याने कामकाज करताना अडचण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. निलंबनाच्या कारवाईनंतर जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागासह इतरही विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना धडकी भरली आहे.