Breaking

ZP School : शाळा सुधारावी म्हणून विद्यार्थ्यांचे ‘भीख मांगो’ आंदोलन!

Students protest over poor condition of school : खरबडीत शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांना बसायलाही जागा नाही

Buldhana ‘शिक्षण हक्काचा’ नारा देणाऱ्या शासनाच्या प्राथमिक शिक्षण व्यवस्था खरबडी येथे पूर्णपणे कोलमडली असून जिल्हा परिषद शाळेच्या दुरवस्थेने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी ‘भिक मांगो आंदोलन’ करत शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधले. शाळा व्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने गटविकास अधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

खरबडी येथील जि.प. शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत अंदाजे १२५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या शाळेत पंखे, लाईट, पिण्याचे पाणी, सुरक्षित छप्पर यांसारख्या मूलभूत सुविधाही उपलब्ध नाहीत. वर्गखोल्यांचे टिनपत्रे गळत असल्याने पावसात विद्यार्थ्यांना उभे राहून शिक्षण घ्यावे लागत आहे.

Nagpur BJP : नवीन पिढीपर्यंत आणीबाणीची दाहकता आणण्यावर भर

शाळेतील समस्येबाबत ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही कुठलीही ठोस कार्यवाही झालेली नाही. २७ मार्च रोजी लेखी तक्रार देऊनही प्रशासन गाढ झोपेतच आहे. ग्रामसभेत मुद्दा उपस्थित करूनही दुर्लक्ष झाले. त्यामुळे ‘शासनाचे लक्ष वेधण्यासाठी’ विद्यार्थ्यांसमोर भिक मागण्याची वेळ आली असल्याचे समितीच्या निवेदनात नमूद आहे.

Swiss Banks: अबब..स्विस बँकांतील भारतीयांचा पैसा तिप्पट वाढला

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान इंगळे, उपाध्यक्ष किशोर सिरसाट, मंगलसिंग सुरडकर, मोहसीन शाह, विजय इंगळे, विशाल राणे, सुरेश किणगे, प्रवीण राणे आदींच्या स्वाक्षऱ्या असलेल्या निवेदनात, शाळेच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Bharat Gogawale : तसं असतं तर आत्तापर्यंत पालकमंत्री पद मिळवलं असतं

या घटनेने ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेतील उदासीनतेवर बोट ठेवले आहे. शिक्षणाच्या गळतीवर चिंता व्यक्त करणारे राज्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी या मुलभूत समस्यांकडे डोळेझाक करत आहेत. खरबडीतील विद्यार्थ्यांना भिक मागण्यासारख्या मार्गाचा अवलंब करावा लागत असेल, तर ते प्रशासनाच्या अपयशाचे प्रतिक नव्हे का?