Supriya Sule : डॉ. घैसास आणि मंगेशकर रुग्णालयाला वाचवणारा अहवाल जाळून टाका !

 

Report that saves to Mangeshkar Hospital in Pune and Dr. Ghaisas released : २४ एप्रिलला उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार

Pune : पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती महिलेचा उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. त्या घटनेचा अहवाल जाहिर झालेला आहे. पण हा अहवाल मंगेशकर रुग्णालय आणि डॉ. घैसास यांना वाचवणारा आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

ससून रुग्णालयाने मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या घडनेचा जो काही अहवाल दिला आहे, तो आम्हाला मान्यच नाही. आम्ही या अहवालाचा निषेध करतो. पैशाच्या हव्यासापायी उपचाराविना एका महिलेचा मृत्यू होतो. आणि अशा प्रकरणातही सरकारकडून कारवाई केली जात नाही. हे धक्कादायक आहे. सरकार किती असंवेदनशील आहे, हेच यातून दिसून येते. पण त्या महिलेला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असे सुप्रिया सुळे यांनी काल (१९ एप्रिल) प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

Shivsena Uddhav Thackeray : शिवसेना धडकली दर्यापूर पं. स. कार्यालयावर!

कुणाची मुलगी, बायको तर कुणाची आई डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मरण पावली. मन हेलावून टाकणारी ही घटना आहे. अशा घटनेचा अहवाल इतका चुकीचा होऊ नाही शकत. नक्कीच हा अहवाल मॅनेज केलेला आहे. हा अहवाल जाळून टाकला पाहिजे. या अहवालाचा निषेध करण्यासोबत आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहो. आमचे सहकारी प्रशांत जगताप येत्या २४ तारखेला उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत, असे खासदार सुळे यांनी सांगितले.

Pune Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल आज होणार सादर !

सरकारमध्ये माणुसकी राहिलेली नाही. पण आम्ही ती सोडलेली नाही. मृत महिलेच्या कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. कारण त्या महिलेची हत्या झाली आहे. आता आम्ही दुसही हत्या होऊ देणार नाही. सर्वसामान्यांसाठी या राज्यात न्याय राहिलेला नाही. सर्वत्र अराजकता माजली आहे. जाहिर झालेल्या अहवालावर आमचा विश्वास नाही. त्यामुळे आम्ही न्यायालयात दाद मागणार. गरज पडली तर न्यायासाठी आम्ही रस्त्यावरही उतरू, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.