MLA Amol Mitkari : सहकार नेत्यांनी पक्ष घरगड्यासारखा वापरला

 

Cooperative leaders used the party for own purpose : आमदार अमोल मिटकरी यांची टीका; शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना धडा शिकविण्याचा निर्धार

Akola राष्ट्रवादी काँग्रेस आता नेत्यांची नव्हे, तर कार्यकर्त्यांची पार्टी बनली आहे. पूर्वी जिल्ह्यातील काही सहकार नेत्यांनी पक्षाचा वापर घरगड्यासारखा केला आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली. मात्र आता अशा नेत्यांना योग्य तो धडा शिकवण्यात येईल, असा तीव्र शब्दांत इशारा आमदार अमोल मिटकरी यांनी दिला.

शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मो. बद्रजुमा मो. आदिल यांना संविधानाची प्रत भेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल काळणे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष रुपाली वाकोडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी बोलताना आमदार मिटकरी म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाध्यक्षपदी मुस्लिम चेहऱ्याला संधी देऊन सर्वसमावेशकतेचा संदेश दिला आहे. जिल्ह्यातील सहकार नेत्यांनी पक्ष हवाेत ठेवून केवळ स्वहितासाठी वापरला. मात्र आता कार्यकर्त्यांना महत्व देणारी आणि त्यांच्या कष्टाची दखल घेणारी नेतृत्वशैली पक्षात निर्माण झाली आहे.”

Vanchit Bahujan Aghadi : तर पाकिस्तानसोबत युद्धाचीही तयारी ठेवा!

नवीन जिल्हाध्यक्ष मो. बद्द्रुजमा म्हणाले, “पक्षात गटबाजीला कोणताही थारा नाही. प्रत्येकाला विश्वासात घेऊन संघटनात्मक कामे केली जातील. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुथस्तर मजबूत करण्यावर भर दिला जाईल.”

जिल्हाध्यक्ष बद्द्रुजमा यांनी सांगितले की, “आधीची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून, लवकरच नवीन कार्यकारिणी गठित केली जाईल. काँग्रेसमधूनही अनेक कार्यकर्ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील.”

Amol Mitkari : महापुरुषाचा ठेका कोणत्याही लोकप्रतिनिधीने घेतलेला नाही !

आपल्यावर पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार, नेते सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, दत्तात्रय भरणे, इंद्रनील नाईक, नवाब मलिक, रुपाली चाकणकर, आमदार संजय खोडके आणि आमदार अमोल मिटकरी यांनी जो विश्वास दाखवला आहे, तो सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही जिल्हाध्यक्षांनी स्पष्ट केले.