व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Eknath shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना

Eknath shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना

eknath-shinde-delhi-visit-bjp-meeting-zilla-parishad-power-sharing-maharashtra : भाजप नेतृत्वाशी भेटीची शक्यता, जिल्हा परिषद सत्तावाटपावरून राजकीय हालचालींना वेग

Mumbai : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली असून उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्या या अचानक झालेल्या दिल्ली दौऱ्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या दौऱ्यात ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबिन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील जिल्हा परिषद सत्तावाटपाच्या मुद्द्यावरून शिवसेना शिंदे गटामध्ये काही प्रमाणात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले जात असल्याची भावना स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. काही जिल्ह्यांमध्ये बहुमत असूनही तडजोड करावी लागत असल्याची खंतही कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. रायगड जिल्ह्यात बहुमत असूनही सत्तावाटपात तडजोड करावी लागली, तर फलटणमध्ये शिवसेनेला सत्तेतून दूर ठेवण्यात आल्याचा आरोप स्थानिक शिवसैनिकांनी केला आहे.

Nagarsevak honorarium : नगरसेवकांना केवळ ४०० रुपयांचा बैठक भत्ता; निदान उपसरपंचाएवढे मानधन द्यावे !

या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. जिल्हा परिषद सत्तावाटप, स्थानिक पातळीवरील राजकीय समन्वय आणि आगामी राजकीय रणनीती यावर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यापूर्वीही नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांच्या काळात भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये काही ठिकाणी मतभेद निर्माण झाले होते. त्या निवडणुकांमध्ये भाजपने अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गटाला धक्का दिल्याची चर्चा होती. त्यावेळी शिवसेना शिंदे गटातील काही पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, ज्यामुळे पक्षात नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.

Chhagan bhujbal : गॅस तुटवड्यावर राज्य सरकारचा तातडीचा निर्णय; पेट्रोल पंपांवर केरोसिन उपलब्ध करणार

यानंतर महापालिका निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा केला होता. त्या दौऱ्यानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये महापालिका निवडणुकांसाठी अनेक ठिकाणी युती करण्यात आली होती. तसेच दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देऊ नये, असा निर्णयही घेतल्याची माहिती समोर आली होती.

महापालिका निवडणुकांमध्ये या युतीला चांगले यश मिळाल्याचे दिसून आले. काही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे महापौर निवडून आले तर काही ठिकाणी भाजपचे महापौर झाले. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून शिवसेना शिंदे गटालाही चांगले यश मिळाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये या दोन्ही पक्षांची युती होती.

मात्र निकालानंतर काही ठिकाणी सत्तावाटपात शिवसेना शिंदे गटाला अपेक्षित स्थान मिळत नसल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात असून या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात पुढील घडामोडींना वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

___

error: Content is protected !!