Breaking

Development projects : विलंबामुळे राज्याचे दीर्घकालीन नुकसान !

 

Ajit Pawar said that the delay will cause long-term loss to the state : विकास प्रकल्प नियोजित वेळत मार्गी लावा

Mumbai : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यभरात सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. विकास कामांची गती राखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्या. विकास कामांतील विलंबामुळे प्रकल्पांची किंमत वाढते. परिणामी राज्याचे दीर्घकालीन नुकसान होते, असे ते यावेळी म्हणाले.

पुणे शहरासह उपनगरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. पुणे रिंग रोडसह मेट्रो, उड्डाणपूल, रिंग रोड आणि सुरू असलेल्या इतर विकास कामांची गती वाढवावी. पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याला आधी प्राधान्य द्यावे. सुरू असलेल्या सर्व प्रकल्पांशी संबंधित सर्व विभागांनी समन्वय राखून पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करावी, असे निर्देश अजित पवार यांनी दिले.

Tribal society : जनावरांसाठी पाणवठे मग माणसांसाठी का नाही ?

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प सनियंत्रण कक्षाची बैठक काल (२८ एप्रिल) घेण्यात आली. बैठकीला नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचित मनीषा म्हैसकर, परिवहन व बंदरे विभागाचे अपर मुख्य सचित संजय सेठी, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे विभागाचे मुख्य अभियंते अतुल चव्हाण उपस्थित होते.

Bhandara Education : शाळा संस्थापकांचे नातेवाईकच बनले मुख्याध्यापक!

दूरदृष्य प्रणालीने पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग, महानगर आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे यांच्यासह पुणे मेट्रो, पीएमआरडीए, संबंधित जिल्ह्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीचे संचालन उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव विकास ढाकणे यांनी केले.