Farmer siblings built a farm road at their own expense : माळवंडीत सामाजिक बांधिलकीचा आदर्श, कौतुकाचा वर्षाव
Buldhana शेत रस्त्याच्या वादातून अनेकदा वांशिक आणि सामाजिक संघर्ष उभे राहतात. मात्र माळवंडी येथील शेतकरी भावंडांनी याला छेद देत सामाजिक सलोखा आणि उदारमतवादी दृष्टिकोनाचा आदर्श घालून दिला आहे. प्रदीप व संदीप रामदास कड या भावंडांनी आपल्या शेतातून जाणारा रस्ता स्वखर्चातून खुला करून दिला असून या कार्याचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
शेतीसाठी मोकळा मार्ग
गावातील अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी अडचणी येत होत्या. धान्याची वाहतूक करतानाही कसरत करावी लागत होती. ही समस्या लक्षात घेऊन कड भावंडांनी सुमारे ५० हजार रुपयांचा खर्च करून मजबूत व उपयोगी रस्ता तयार केला.
Dongao Grampanchayat : तीन अपत्ये, अतिक्रमण; ग्रामपंचायत सदस्य अपात्र
रस्त्यावरून वाद नको; सलोखा हवा
परंपरेनुसार काही रस्ते वापरासाठी खुले ठेवले जातात, तर काही केवळ विश्वासावर चालतात. मात्र अनेकदा हा विश्वास तुटतो आणि संघर्ष निर्माण होतो. याउलट कड बंधूंनी रक्तरंजित वादांना थारा न देता, रस्ता खुला करून शेतकऱ्यांना दिलासा दिला.
पावसाळ्यापूर्वी दिली मोठी सोय
पावसाळ्याच्या तोंडावर तयार झालेला रस्ता शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी ठरणार आहे. रस्त्यामुळे शेतीची कामे वेळेत होतील आणि उत्पादनावर परिणाम होणार नाही, असा आनंद ग्रामस्थांनी व्यक्त केला.
Buldhana Police : साहेब, संसार उध्वस्त झाला, आता तरी दारूबंदी करा!
आदर्श निर्माण केला
शेतजमिनीवरून भावंडांमध्ये वाद होत असल्याचे नेहमी आपण ऐकत असतो. मात्र, एका उत्तम कार्यासाठी कुठलाही वाद न ठेवता दोन भावांनी केलेली कृती समाजात आदर्श निर्माण करणारी आहे, अशी भावना लोक व्यक्त करत आहेत.