व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र LPG crisis : दोन दिवसांत बंद होऊ शकतात हॉटेल्स, कॅटरिंगही धोक्यात!

LPG crisis : दोन दिवसांत बंद होऊ शकतात हॉटेल्स, कॅटरिंगही धोक्यात!

lpg-shortage-may-affect-hotel-catering-restaurents : गॅस साठ्याचा दावा; मग हॉटेल व्यवसायिकांवर निर्बंध का?, अकोल्यात तीव्र नाराजी

Akola राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील व्यावसायिक एलपीजी गॅसच्या वापरासाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे अकोला शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, स्वीट मार्ट व केटरिंग व्यवसायिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शासनाच्या आदेशानुसार रुग्णालये, शैक्षणिक संस्था तसेच इतर अत्यावश्यक सार्वजनिक सेवांना गॅस पुरवठा प्राधान्याने करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र या प्राधान्य यादीतून हॉटेल, रेस्टॉरंट, स्वीट मार्ट व केटरिंग व्यवसायिकांना वगळण्यात आल्याने खाद्य व्यवसायावर मोठे संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर अकोला शहरातील खाद्य व्यवसायिक, हॉटेल संचालक आणि केटरिंग व्यावसायिकांची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत शासनाच्या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. व्यवसायिकांचे म्हणणे आहे की, एका बाजूला अनेक मंत्री देशात गॅसचा पुरेसा साठा असल्याचा दावा करतात, तर दुसऱ्या बाजूला हॉटेल व्यवसायावर गॅस पुरवठ्याचे निर्बंध लादले जात आहेत. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Congress Shrirang Barge : MSRTC : एसटीतील भ्रष्टाचाराला लोकप्रतिनिधींचा पाठींबा

शासनाने या निर्णयाचा तातडीने फेरविचार करून हॉटेल व खाद्य व्यवसायिकांना सुरळीत गॅस पुरवठा करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. अन्यथा पुढील दोन दिवसांत अकोला शहरातील सुमारे ५० टक्के हॉटेल व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते, अशी चिंता व्यवसायिकांनी व्यक्त केली.
या संदर्भात सोमवारी अकोला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन हॉटेल, रेस्टॉरंट, स्वीट मार्ट व केटरिंग व्यवसायिकांच्या समस्या सोडवण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
या बैठकीला अकोला हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष योगेश अग्रवाल यांच्यासह ओमप्रकाश गोयंका, कृष्णकुमार राठी, भावेश खिलोसिया, श्रीराम पांडे, जसपाल सिंग नागरा, प्रशांत देशमुख, श्रीकांत देशमुख, विवेक मंत्री, डॉ. मनोज अग्रवाल, बोनीभाई शहा, पिंटू सेठ गोसावी, संजय सिसोदिया, गुड्डू ठाकूर, दीपक वोरा, भूषण मेहता, ईश्वर जैन, आनंद अग्रवाल, सागर अमानकर, हर्षल भांबेरे, रविभाऊ घाटे, गजानन खंडेलवाल, धनुभाई खिलोसिया, अश्विनभाई खिलोसिया, यश मेहता यांच्यासह मोठ्या संख्येने हॉटेल, रेस्टॉरंट, स्वीट मार्ट व केटरिंग व्यवसायिक उपस्थित होते.

MSRTC : एसटीचा ‘कागदी’ कारभार; ७२ टक्के संपर्क क्रमांक बंद!

अकोला हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष योगेश अग्रवाल यांनी शासनाने व्यावसायिक सिलिंडर वितरणाच्या प्राधान्य यादीत हॉटेल, रेस्टॉरंट, स्वीट मार्ट व केटरिंग व्यवसायिकांचा किमान काही प्रमाणात समावेश करून न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

error: Content is protected !!