Breaking

India – Pakistan War : पाकिस्तान केवळ धमकी देऊ शकतो !

Pakistan can only threaten said Congress Leader Vijay Wadettiwar : दुसऱ्यांच्या कुबड्या घेऊन लढण्याचा प्रयत्न

Nagpur : पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात भारताने तेथील सामान्य नागरिकांना कुठलेही नुकसान पोहोचवलेले नाही. भारतीय सेना बलाढ्य आहे. सैन्याने दाखवलेल्या शौर्याचे आम्ही स्वागत केले आहे, असे काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

नागपुरात आज (८ मे) पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, पाकिस्तानला पूर्णपणे ठेचून काढले जात असेल तरीही केंद्र सरकार आणि भारतीय सैन्यासोबतच राहू. त्यासाठी सगळ्यांचंच समर्थन असणार आहे. आमचे नेते राहुल गांधी यांही हीच भूमिका मांडलेली आहे. पाकिस्तानला त्यांची लायकी दाखवायची असेल तर आम्ही काय विरोधात असलेल्या इतरही पक्षांतील सर्व लोक सरकारसोबत राहतील.

Ladki Bahin Yojana : १५०० रुपयांत बहीणी खुश आहेत का? ‘स्थानिक’ निवडणुकांत दिसेल..!

दहशतवाद्यांकरवी निष्पाप नागरिकांवर भ्याड हल्ला करणारा पाकिस्तान केवळ धमकी देऊ शकतो. प्रत्यक्षात काही करू शकत नाही. दुसऱ्यांच्या कुबड्या घेऊन त्यांच्या जोरावर भारताशी लढायला निघाला आहे. पण यामध्ये पाकिस्तानला यश मिळणारच नाही. कुणाचीही मदत घेतली तरीही भारतीय सैन्यासमोर त्यांचा टिकाव लागणार नाही. मुळात भारताच्या विरोधात लढण्याची ताकद पाकिस्तानमध्ये नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar : अरे..! येथेही स्वतःचे मार्केटींग करताय का ? वडेट्टीवार संतापले..

हल्ल्याचा भावनात्मक फायदा उचलण्यासाठी सरकारने ऑपरेशन सिंदूर हे नाव दिले, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. यासंदर्भात विचारले असता, लष्कराच्या वेगवेगळ्या कारवायांना वेगवेगळी नावं दिली जातात. आतंकवादी पहलगाममध्ये येऊन आपल्या लोकांना ठार मारून गेले. त्यानंतर सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले. सरकार याचा भावनिक फायदा उचलण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.