PM will inaugurate Netaji Subhash Chandra Bose Itwari Station : ऑनलाईन पद्धतीने होणार सोहळा; आमगाव, चांदाफोर्टचाही समावेश
Nagpur ‘अमृत भारत स्टेशन योजने’ अंतर्गत तयार करण्यात आलेल्या १०३ रेल्वे स्थानकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ मे रोजी करणार आहेत. यामध्ये नागपूरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वेस्थानकाचाही समावेश आहे. ऑनलाईन माध्यमातू होणाऱ्या या कार्यक्रमात अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण इतवारी स्थानकाचेदेखील लोकार्पण होणार आहे हे विशेष.
दपूम रेल्वेच्या माहितीनुसार नागपूर विभागातील १५ स्थानकांना या प्रकल्पात समाविष्ट करण्यात आले होते. त्यातील पाच स्थानकांचे काम पूर्ण झाल्याने त्याचे लोकार्पण पंतप्रधान मोदी करतील. गेल्या १६ महिन्यात देशातील १०३ रेल्वे स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा २२ मे रोजी पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन होणार आहे. यात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील, महाराष्ट्रातील नागपूरचे नेताजी सुभाषचंद्र बोस ईतवारी, चांदाफोर्ट आणि आमगाव या स्थानकांचा समावेश आहे. मध्य प्रदेशातील शिवनी तसेच छत्तीसगडमधील डोंगरगड स्थानकाचाही यात समावेश आहे.
Nagpur Zilla Parishad : जिल्हा परिषदेकडून सरकारच्या निर्देशांना केराची टोपली
उर्वरित १० स्थानकांचे काम प्रगतिपथावर आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील १३०९ रेल्वे स्थानकांना अत्याधुनिक सोयी-सुविधांनी परिपूर्ण करण्याची योजना आखण्यात आली होती. फेब्रुवारी २०२३ मध्ये या प्रकल्पाला सुरुवात झाली होती. रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासोबतच प्रवाशी सुविधांचा विस्तार या योजनेत ठेवण्यात आला होता.
Chandrashekhar Bawankule : बावनकुळे म्हणाले, कामात दिरंगाई, तर होईल कारवाई!
या योजनेअंतर्गत इतवारी रेल्वेस्थानक तयार झाले असून तेथे प्रवाशांना स्वच्छ वेटिंग रूम, रेस्टॉरंट, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, पुरेशी पार्किंग आणि प्रशस्त रस्ते आदी सुविधा मिळतील. याशिवाय उपरोक्त रेल्वे स्थानकांना बस, टॅक्सी तसेच ऑटो रिक्षा स्टॅण्डशी जोडले जाणार आहे.