Ward formation process for local election after next week : गटांची संख्या ठरणार; लोकसंख्येची माहिती शासनाकडे रवाना
Akola-Amravati राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेची प्रक्रिया पुढील आठवड्यानंतर सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारसंघांची (गट व गण) संख्या निश्चित होणार आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्याचे आदेश दिल्यानंतर ही प्रक्रिया गतीने राबविली जात आहे. निवडणुकीच्या कामकाजात प्रथम सदस्यसंख्या ठरते. त्यानंतर प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाते. या प्रारूपावर हरकती व सूचना मागवण्यात येतात. त्यानंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या सुनावण्या होतात आणि त्यांच्या शिफारशींच्या आधारे अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाते.
Siddharth Kharat : बियाणं, खत, औषधं उधारीवर आणले… सगळंच पाण्यात गेलं
यानंतर आरक्षणासाठी सोडत काढली जाते. त्यावरही हरकती व सूचना मागवून अंतिम आरक्षण निश्चित केले जाते. त्यानंतर मतदार यादीचे विभाजन, प्रारूप यादी प्रसिद्ध करणे, हरकती मागवणे, अंतिम मतदार यादी जाहीर करणे आणि अखेरीस निवडणूक कार्यक्रम घोषित केला जातो.
सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यासाठी ग्रामविकास विभागाने जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक माहिती तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले होते. यानुसार जिल्हा प्रशासनाने लोकसंख्येसह संबंधित माहिती शासनाकडे पाठवली आहे. त्यामुळे प्रारूप प्रभाग रचनेची कार्यवाही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Navnirman Sena : चिखलीतील वृक्षतोडीकडे वन विभागाचं दुर्लक्ष
या निवडणुकीत २०११च्या जनगणनेचा आधार घेतला जाणार असला, तरी गेल्या दहा वर्षांत झालेल्या लोकसंख्या आणि मतदारसंख्येतील वाढीचा विचार करता काही प्रभागांमध्ये फेररचना होण्याची शक्यता आहे. अंतिम निर्णय ग्रामविकास विभागाकडून घेतला जाणार आहे. मतदारसंघ जुने राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.