Breaking

NCP Sharad Pawar : २५ वर्षे शरद पवारांसाठी कामे केले, आता अचानक काय झाले?

Senior leader from nagpur rural resigns from party : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा राजीनामा, कोणत्या पक्षात जाणार?

Nagpur १९९९ पासून म्हणजे गेली २५ वर्षे शरद पवारांसाठी काम केल्यानंतर अचानक पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय नेत्याने घेतला. आता अडिच दशकं एकनिष्ठ राहिल्यानंतर अचानक एका दिवसात असे काय झाले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यात ही मोठी घटना मानली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यांनी स्वतःच पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. परंतु आता ते कुठल्या पक्षात जाणार आहेत, याबाबत त्यांनी काहीच सांगितले नाही. पक्षाच्या स्थापनेपासून ते एकनिष्ठ होते. निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी राजिनामा दिल्याने पक्षाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Nagpur Municipal Corporation : लोकांचे अतिक्रमण काढणाऱ्या मनपानेच केले अतिक्रमण!

चंद्रशेखर चिखले हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून म्हणजे १९९९ पासून पक्षात सक्रिय आहेत. २०१४ मध्ये अनिल देशमुख यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही ते देशमुख आणि पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. ते १९९७ साली काटोल पंचायत समितीचे सभापती, २००७ मध्ये सभापती, उपसभापती राहिले होते.

२०१२ मध्ये ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीवर होते. पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करताना नेतेमंडळींचा आपल्यावरील विश्वास कमी झाल्यामुळे किंवा आपण कुठेतरी कमी पडल्यामुळे आपण पक्षाच्या प्राथमिक सदस्य व सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बंडू राठोड, पुरुषोत्तम कोहळे, मनोहर हेलोंडे, इशाक बराडे उपस्थित होते.

High Court Nagpur : पणनमंत्र्यांना उच्च न्यायालयाची नोटीस!

चिखले आता नेमके कुठे जाणार याबाबत विविध कयास लावण्यात येत आहे. त्यांना भाजपने संपर्क केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र पक्षाच्या स्थापनेपासून सोबत असलेल्या चिखलेंनी पक्षाचा राजिनामा देण्याची वेळ यावी असे नेमके काय झाले असावे याबाबत विविध कयास वर्तविण्यात येत आहेत.