Farmer’s pannel won the elections : संग्रामपूर खविसंवर शेतकरी परिवर्तन पॅनलचा एकतर्फी झेंडा
Khamgao संग्रामपूर खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या निवडणुकीत ‘शेतकरी परिवर्तन पॅनल’ने प्रचंड राजकीय पाठबळासह विरोधकांचा धुव्वा उडवत तब्बल १५ पैकी १४ जागांवर दणदणीत विजय मिळवला. ‘जमिनीवरची छत्री’ हे निवडणूक चिन्ह घेऊन मैदानात उतरलेल्या परिवर्तन पॅनलने ‘आकाशात घिरट्या घालणाऱ्या’ हेलिकॉप्टर चिन्हाच्या पॅनलला जमिनीवरच उतरू दिलं नाही.
या निकालामुळे तालुक्यात सहकार क्षेत्रात परिवर्तन पॅनलचं वर्चस्व सिद्ध झालं असून, यामागे भाजपा आमदार डॉ. संजय कुटे यांचे राजकीय मार्गदर्शन आणि शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम दाणे यांचे संघटन कौशल्य स्पष्टपणे जाणवले.
मतमोजणी सकाळी ९ वाजता सुरू झाली. बॅलेटवर निवडणूक झाल्याने निकाल जाहीर होईपर्यंत कार्यकर्त्यांमध्ये तणाव होता. मात्र दुपारनंतर स्पष्ट आकडे समोर येताच ‘छत्री’खालचे उमेदवार विजयी होणार हे निश्चित झाले.
शेतकरी परिवर्तन पॅनलच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोषात घोषणा देत तालुक्याच्या राजकीय नकाशावर आपली छाप उमटवली. यावेळी शांताराम दाणे, गजानन सरोदे, निलेश शर्मा यांच्यासह प्रमुख नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Rashtriya Swayamsewak Sangh : विकसित राष्ट्रासाठी पंचसूत्रीचा संकल्प करा!
विजयी उमेदवारांचे तपशील पुढीलप्रमाणे :
सेवा सहकारी संस्था मतदार संघ – गजानन शंकरराव दाणे, गणेश भुते, पुरुषोत्तम मुरुख, संजय वाकडे, माधव फाळके
महिला राखीव – वैशाली अवचार, ज्योतीताई लव्हाळे
सर्वसाधारण मतदार संघ – रमेश नारोडे, शिवहरी खोड, उध्दवराव व्यवहारे, माधव आगरकर, राजेंद्र देशमुख
विमुक्त भटक्या जमाती – प्रकाश उभे
अनुसूचित जाती – निरंजन इंगळे
इतर मागासवर्गीय – विश्वास वरणकार