Soybean crop at risk due to disease, demand for compensation : तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी, निवेदन सोपवले
Buldhana उशिरा पाऊस आल्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर आता हुमणी अळीने आणखी एक संकट ओढवले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सोयाबीन पिकावर हुमणी अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला असून पिकं सुकू लागली आहेत, मुळे कुरतडली जात आहेत आणि शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे.
या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे की, हुमणी अळीमुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जावी. तसेच दुबार पेरणीसाठी तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी.
Adivasi Pardhi Vikas Parishad : पारधी समाजाची घरे पूर्वसूचना न देताच पाडली, स्वप्नांचा चुराडा
सोयाबीन पीक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर
जिल्ह्यात सोयाबीन हे नगदी व प्रमुख पीक असून लाखो शेतकऱ्यांचे जगणं या पिकावर अवलंबून आहे. मात्र हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन पिके कोलमडू लागली असून अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ आली आहे.
या अळीचा फटका इतका तीव्र आहे की झाडांची पाने पिवळी पडून सुकत आहेत, मुळे कुरतडली जात असून २-३ इंच खोलीवर अळ्या आढळून येत आहेत.
Ravikant Tupkar : उखडलेले रस्ते, साचलेले पाणी, घाणीचे साम्राज्य!
महागड्या फवारण्या निष्प्रभ
शेतकरी कर्ज घेऊन पेरणी करतात. उशिरा झालेला पाऊस, आता हुमणी अळीचा प्रकोप, त्यात महागडी फवारणी करूनही किडीवर नियंत्रण येत नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचून गेला आहे. या वर्षीचा संपूर्ण खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
Ravikant Tupkar : बैल नाही म्हणून औत ओढणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याला ‘क्रांतिकारी’चा आधार!
“शेतकऱ्यांनी वेळीच कर्ज काढून पेरणी केली, पण आता दुबार पेरणीची वेळ आली आहे. नुकसानभरपाई व मदतीशिवाय शेतकरी जगणार कसा?” असा सवाल तुपकर यांनी उपस्थित केला. त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे की, कृषी विभागामार्फत सर्व तालुक्यांत तातडीने पंचनामे करण्यात यावेत आणि शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळावी.