Congress women MPS : दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज, काँग्रेसच्या महिला खासदारांनी दुबे यांना ठणकावले!

Congress state president Sapkal tweets, expresses pride over the incident : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचे ट्विट, घटनेबद्दल व्यक्त केला अभिमान

Mumbai : मराठी अस्मितेचा अपमान करणाऱ्या भाजप खासदार डॉ. निशिकांत दुबे यांना दिल्लीत ठणकावून उत्तर देत काँग्रेसच्या महिला खासदारांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे जोरदार प्रतिनिधित्व केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करत या घटनेबद्दल अभिमान व्यक्त केला असून, राज्याच्या अस्मितेवर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला काँग्रेस पक्ष कठोरपणे प्रत्युत्तर देईल, हे स्पष्ट केले.

हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,
महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा अपमान करणारा, चिथावणीखोर आणि बेताल भाजप खासदार डॉ. निशिकांत दुबेला ठणकावून प्रत्युत्तर देत, आमच्या भगिनी काँग्रेस पक्षाच्या खासदार वर्षाताई गायकवाड, खा. शोभाताई बच्छाव व प्रतिभाताई धानोरकर यांनी काँग्रेस पक्षाची व महाराष्ट्राची भूमिका ठामपणे दिल्लीत मांडली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

Admissions suspended : शिक्षण मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींच्या 113 महाविद्यालयांचे प्रवेश थांबवले !

 

निशिकांत दुबे यांनी केलेल्या एका वक्तव्यात मराठी जनतेच्या भावना दुखावणारे आणि अपमानकारक शब्दप्रयोग केल्याचे आरोप आहेत. याविरोधात काँग्रेसच्या महिला खासदारांनी एकत्रितपणे दुबेंचा निषेध करत संसदेतच त्यांचा समाचार घेतला. वर्षाताई गायकवाड, शोभाताई बच्छाव आणि प्रतिभाताई धानोरकर यांनी एकजुटीने महाराष्ट्राच्या आणि मराठी अस्मितेच्या समर्थनार्थ आवाज उठवला. संसदेत मराठीचा आवाज घुमवणाऱ्या या महिला खासदारांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Gulabrao Patil : ‘कुठलंच बिल प्रलंबित नाही’ मंत्री गुलाबराव पाटील यांचा इन्कार

महाराष्ट्राचा स्वाभिमान खपवून घेणार नाही. प्रदेशाध्यक्ष सपकाळ पुढे म्हणाले, महाराष्ट्राचा स्वाभिमान, अस्मिता आणि आवाज दाबण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर काँग्रेस पक्ष तो खपवून घेणार नाही, हे तुम्ही दाखवून दिले. ही काँग्रेस पक्षासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी मराठी माणसांसाठी गर्व आणि अभिमानाची बाब आहे. ही घटना समोर येताच राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले असून, अनेक पक्ष आणि नेतेमंडळीनीही भाजप खासदारांच्या विधानाचा निषेध केला आहे. सोशल मीडियावर ‘हेअर स्टाईलजयमहाराष्ट्र’ आणि ‘हॅशटॅग मराठीप्राइड’ ट्रेंड होत असून, सामान्य जनतेमधूनही काँग्रेसच्या या भूमिकेचे स्वागत होत आहे.