व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Katol blast : काटोलमधील स्फोटावर विधानसभेत स्फोटक आरोप-प्रत्यारोप; कंपनी बंद करण्याचे आदेश

Katol blast : काटोलमधील स्फोटावर विधानसभेत स्फोटक आरोप-प्रत्यारोप; कंपनी बंद करण्याचे आदेश

Minister-Akash-fundkar-informed-sbl-company-sealed-budget-session : सरकार दोषींना पाठीशी घालत असल्याचा विरोधकांचा टीका

Nagpur: काटोल तालुक्यातील राऊळवाडा येथील सोलायर बायो सायन्सेस कंपनीत झालेल्या भीषण स्फोटाचे पडसाद आज विधानसभेत उमटले. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विरोधकांनी सरकारवर दोषींना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप करत सभागृहात सरकारचा निषेध नोंदवला. यावर उत्तर देताना कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी संबंधित कंपनी तत्काळ बंद करण्याचे आदेश दिल्याची माहिती दिली, तसेच विभागीय चौकशीचा अहवाल प्राप्त होताच एकाही दोषीला सोडले जाणार नाही, असे आश्वासन दिले.

या प्रकरणावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यांनी या दुर्घटनेला जबाबदार धरत कामगार आयुक्तांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

Rajya sabha election : मोठा ट्विस्ट शरद पवार बिनविरोध राज्यसभेत!

चर्चेदरम्यान कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी माहिती दिली की, या भीषण अपघातानंतर प्रथमच कंपनीच्या मालकासह २१ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हे दावे खोडून काढले. दाखल केलेली कलमे जामीनपात्र असून आरोपी उद्याच सुटतील, असा दावा करत त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. वडेट्टीवार यांनी ही घटना म्हणजे सामूहिक हत्याकांड असल्याचे सांगत दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

एसबीएल कंपनीत झालेल्या या स्फोटात आतापर्यंत २१ कामगारांचा मृत्यू झाला असून, ८० टक्क्यांहून अधिक भाजलेले सात कामगार नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. विशेष म्हणजे, याच कंपनीत यापूर्वी दोनदा स्फोट होऊन दोघांचा मृत्यू झाला होता. “नेहमीप्रमाणे एखादा मॅनेजर पुढे करून मालकाची सुटका करण्याचे प्रयत्न आम्ही हाणून पाडले असून, यावेळी खुद्द मालक आणि व्यवस्थापकीय संचालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत,” असे स्पष्टीकरण राज्यमंत्री जयस्वाल यांनी दिले.

या वादात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही उडी घेतली. ज्यांच्या कंपन्यांमध्ये स्फोट होऊन कामगारांचे बळी जातात, त्यांना तुम्ही पद्मश्री पुरस्कार देता, असा टोला लगावत त्यांनी सरकारवर कारखाना मालकांना वाचवत असल्याचा आरोप केला.

Sunetra pawar : 20 पेक्षा जास्त आमदारांची सुनेत्रा पवारांशी तातडीची बैठक

अखेर वाढता गदारोळ पाहून कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी मध्यस्थी केली. विभागीय चौकशीनंतर गरज पडल्यास ३०२ सारखे कठोर कलम लावण्यात येईल. तोपर्यंत ही फॅक्टरी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अधिकारी असो वा मालक, कोणाचीही गय केली जाणार नाही, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले. तरीही सरकारच्या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही आणि त्यांनी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत आपला संताप व्यक्त केला.

error: Content is protected !!