Breaking

Sudhir Mungantiwar : सातारकर म्हणून आम्हाला सुधीरभाऊबद्दल नितांत आदर !

Shivendraraje Bhosale’s prayer to Mata Mahakali of Chandrapur : सुधीरभाऊ फक्त आमदार किंवा माजी मंत्री नाहीत, तर ते आमचे नेते

Chandrapur : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले हे आज (२६ जुलै) चंद्रपूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. मुनगंटीवारांनी आपल्या परिवाराच्यावतीने आणि चंद्रपूरकरांच्यावतीने त्यांचे जोरदार स्वागत केले. या स्वागताने मंत्री शिवेंद्रराजे भारावले. ते म्हणाले की येवढ्या आत्मीयतेने आणि भव्य स्वागत मी मंत्री झाल्यापासून अद्यापही कुणी केले नाही.

सत्काराला उत्तर देताना शिवेंद्रराजे म्हणाले, सुधीरभाऊ फक्त आमदार किंवा माजी मंत्री नाहीत, तर ते आमचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात आम्ही सर्व जण राज्यात काम करतोय. त्यांचे स्थान आमच्या सर्वाच्या दृष्टीने फार वरचे आणि महत्वाचे आहे. ही माझी आमदारकीची पाचवी टर्म आहे. मी भाऊंना विधानसभेत नेहमीच बघतो आणि त्यांच्याकडून नेहमीच काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो. माझे वडील अभयसिंह राजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यांच्यानंतर मी राष्ट्रवादीतून तीन वेळा आमदार झालो. आता भाजपकडून आमदार झालो. सुधीरभाऊंसारखा दांडगा अभ्यास आणि वक्तृत्व शैली आजवर बघितली नाही.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार म्हणाले, …म्हणून शिवाजी महाराज सर्व राजांपेक्षा वेगळे !

ईतिहास आणि वर्तमान स्थितीचा अभ्यास, प्रत्येक विषयाची आकडेवारीनिशी अचूक माहिती, हे भाऊंकडे बघूनही शिकणे शक्य नाही. आपण फक्त प्रयत्न करू शकतो. भाऊंकडे बघून जेवढे शिकता येईल, तेवढे शिकण्याचा माझा प्रयत्न असतो. सुधीरभाऊ कुठल्या मंत्र्यांकडे, अधिकाऱ्याकडे किंवा एखाद्या विभागातही गेले. तरी सगळे अलर्ट मोडमध्ये येतात. भाऊंना काहीही उत्तर देऊन चालत नाही. जे कायद्यात असेल तेच त्यांना पाहिजे. नाहीतर कुणाची खैर नाही. विधानसभेतही आम्ही बघितलं की सरकारची, मंत्र्यांची चुकही ते दाखवतात, असे शिवेंद्रराजे यांनी सांगितले.

लोकांसाठी आपल्याला काम करायचं आहे. भाजप आणि इतर पक्षांमध्ये हाच फरक आहे, स्वतःसाठी नाही तर, ज्यांनी आपल्याला निवडून दिले त्यांच्यासाठी काम करायचे आहे. त्याप्रमाणे काम झाले पाहिजे. छत्रपतींची वाघनखं आपण लंडनला जाऊन बघायचे अन् परत यायचो. ते भारतात आणण्याचे काम भाऊंनी केले. ही वाघनखं त्यांनी पहिल्यांदा सातारला आणली. सातारा ही मराठ्याची राजधानी होती. भाऊंनी सातारकरांचा मानसन्मान ठेवला. नाहीतर ही वाघनख ते पहिले नागपूरलाही घेऊन जाऊ शकले असते. तो त्यांचा अधिकारही होता. पण त्यांनी आधी साताऱ्याची ओळख ठेवली. मग वाघनखांचा पुढचा प्रवास सुरू झाला. सातारकर म्हणून आम्हाला भाऊंबद्दल प्रचंड आदर आहे, असे गोरवोद्गार शिवेंद्रराजे यांनी काढले.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी एका झटक्यात खोडून काढले तथाकथित अर्थतज्ज्ञांचे आरोप !

सुधीरभाऊंकडून शिकण्यासारखा एक महत्वाचा गुण म्हणजे कागदपत्रांचा रेकॉर्ड ठेवणे. ते मंत्र्यांना सांगतात की किती पत्र दिले, कोणत्या कोणत्या तारखेला दिले, याचा रेकॉर्ड त्यांच्याकडे तयार असतो. कुठली मागणी कधी गेली होती, हेही ते केव्हाही अचूक सांगतात. त्यामुळे भाऊंच्या आमच्यावर आदरयुक्त दबाव आहे. मी जरी मंत्री असलो तरी आमचे नेते म्हणून सुधीरभाऊंकडे बघतो. त्यांच्या मार्गदर्शनात बांधकाम विभागात नवीन गोष्टी करणे शक्य आहे, ते मी करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करणार आहे. जेव्हा भाजपमध्ये आलो आणि जेव्हा जेव्हा भाऊंना भेटायचो. आमच्या घराण्यातले विषय ते आत्मीयतेने विचारायाचे. माझे वडील १९८० मध्ये मंत्री होते. त्यांना पर्णकुटी बंगला मिळाला होता. सुधीरभाऊंनासुद्धा पर्णकुटी मिळाला होता. जेव्हा जेव्हा त्यांना भेटायला जायचो, तेव्हा तेव्हा लहानपणीच्या आठवणी ताज्या व्हायच्या.

Sudhir Mungantiwar : अरबिंदो कंपनीच्या कोळसा खाण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी विधीमंडळात ठाम पाठपुरावा

चंद्रपूर आणि गडचिरोली पहिले दुर्लक्षित जिल्हे समजले जायचे. पण आता उलटं झालं आहे. भाऊंचे नेतृत्व असल्यामुळे विकास वेगाने झाला आहे. हा परिसर आता दुर्लक्षित राहिलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री फडणवीस, केंद्री मंत्री नितीन गडकरी आणि सुधीर मुनगंटीवार या नेत्यांनी या परिसराला नवी ओळख दिली. आजही स्वागत स्वीकारताना भाऊंसमोर बसायला थोडं अवघडल्यासारखं झालं. पण त्यांनी बस म्हटलं की बसावंच लागत . मंत्री झाल्यापासून असं स्वागत माझं अद्याप कुणीही केलं नाही, हे त्यांनी आवर्जून पुन्हा नमूद केलं.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या पुढाकाराने धान उत्पादकांना मिळणार गोसिखुर्दचे पाणी !

सुधीरभाऊंच्या सुचनेप्रमाणे रस्ते, पूल सर्व कामे मार्गी लाऊ, असे आश्वासन देत त्यांनी मुनगंटीवारांना सातारला प्रतापगड आणि सज्जनगडला येण्याचे निमंत्रण दिले. समर्थ रामदास स्वामींचे देवस्थान आहे. लोकांनी त्यांच्या वापरात असलेल्या गोष्टींचे जतन करून ठेवले आहे. स्वामी ध्यान करायचे ती काठी आहे आणि कपडे आजही तेथे असल्याची माहिती शिवेंद्रराजे यांनी दिली.