Khotkars question on Gorantyals entry into BJP :गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशावर खोतकरांचा सवाल
Jalna : काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर, शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी यावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाजपच्या भूमिकेवर तसेच गोरंट्याल यांच्या पक्षांतरावर थेट सवाल उपस्थित केला आहे.
“ज्यांच्याकडे जनाधार नाही, अशा लोकांना भाजपमध्ये घेतल्याने पक्ष काय साध्य करू इच्छितो?” असा सवाल खोतकर यांनी केला. त्यांनी सूचकपणे म्हटलं की, “भाजप नेत्यांना कदाचित कैलास गोरंट्याल यांच्यावर असलेले आरोप माहिती नसेल.” तसेच, “तुझ्यात दम असेल तर पुन्हा ये,” अशा शब्दांत त्यांनी गोरंट्याल यांना थेट आव्हानही दिलं.खोतकर यांनी म्हटलं की, “ज्या लोकांनी तुला निवडून दिलं, त्यांच्याशी तू गद्दारी केलीस.” याचबरोबर, “भाजपमध्ये जाण्यासाठी तू किती खोके घेतलेस?” असा थेट आरोप करत त्यांनी संपूर्ण घडामोडींमागे स्थानिक पातळीवरील षड्यंत्र असल्याचे सांगितले.
Maharashtra politics : सप्टेंबरनंतर राज्यात मोठा स्फोट? सत्तेतील उलथापालथीचे संकेत
गोरंट्याल यांच्या प्रवेशावर पक्षपातळीवरही नाराजीचा सूर आहे. “ही गोष्ट आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडली आहे आणि ते भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी यावर चर्चा करतील,” असे खोतकर यांनी स्पष्ट केलं.दरम्यान, गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशामागे कोण आहे, याबाबतही लवकरच खुलासा करू, असा इशारा खोतकर यांनी दिला आहे.
___