Breaking

Bomb blast case : बॉम्बस्फोट आपोआप होत नाहीत; मग ते करणारे कोण?

Question from Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati : शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल

Mumbai : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर देशात ‘भगवा दहशतवाद’ या संकल्पनेवरून वाद सुरू असतानाच शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही खडसावत थेट सवाल उपस्थित केला आहेत.

“बॉम्बस्फोट आपोआप होत नाहीत. ते कोणीतरी करतं. मग ते करणारे कोण आहेत, हे शोधण्यात सरकार आणि तपास यंत्रणा का अपयशी ठरत आहेत?” असा ठोस सवाल त्यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “दहशतवादी हा दहशतवादीच असतो. त्याला कोणताही रंग नसतो. भगवा दहशतवादी असेल तर काय त्याची पूजा करणार आहात का? दहशतवाद म्हणजे हिंसा आणि मृत्यू. त्यात धर्म, जात, रंग शोधणं ही दिशाभूल करणारी गोष्ट आहे.”

Dancebar case : तुमच्या खानदानाचा व्यवसाय काय? ‘ कोहिनूर’चा हिशेब सांगा !

शंकराचार्य म्हणाले, “मुंबईमध्ये सात बॉम्बस्फोट झाले, मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला, पण आरोपी सापडले नाहीत. तपास यंत्रणा आणि सरकार यांचं हे अपयश गंभीर आहे. कोणी येतं, स्फोट घडवून जातं, आणि आपण त्यांना सापडवू शकत नाही, हे आपल्याच यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर मोठा सवाल आहे.” पक्षपाती राजकारणावर टीका करताना त्यांनी म्हटलं की, “जेव्हा दहशतवाद्यांना शोधण्याची वेळ येते, तेव्हा स्वतःच्या उणिवा लपवण्यासाठी राजकीय पक्ष रंग शोधू लागतात.

Devendra Fadnavis : मत्स्यव्यवसायामुळे वाढतील रोजगार, मुख्यमंत्र्यांना विश्वास

मेल्यानंतर माणसाचे डोळेही रंग बघत नाहीत. मग तुम्ही दहशतवादात रंग शोधता? हे पक्षपातीपणाचं लक्षण आहे.”शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांनाही स्पष्ट शब्दांत सुनावत म्हटलं की, “दहशतवाद्यांचा शोध घेण्यात सरकार अयशस्वी ठरलं आहे. तपास यंत्रणांचा खर्च आणि वेळ वाया जातो, तरी निष्कर्ष लागत नाहीत. हे अत्यंत चिंताजनक आहे.”