Black Box GPS : केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचा ट्रॅक्टर मोर्चा

Congress’ tractor march against the central government : “ब्लॅक बॉक्स-जीपीएस” रद्द करण्याची मागणी

Motala केंद्र सरकारने ट्रॅक्टर धारकांना ब्लॅक बॉक्स आणि जीपीएस बसविणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयाविरोधात मोताळा तालुका काँग्रेस कमिटी आणि किसान काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. त्यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला बळ दिले. मारुती संकुलातून सुरू झालेला मोर्चा घोषणाबाजीच्या गजरात तहसील कार्यालयावर पोहोचला.
मोर्चात शेकडो ट्रॅक्टर, हजारो शेतकरी, महिला, युवक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा सहभाग होता. “शेतकरी एकता जिंदाबाद”, “कृषीविरोधी सरकार हाय हाय”, “ब्लॅक बॉक्स-जीपीएस निर्णय रद्द करा” अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले.

मोर्चाच्या शेवटी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की, “सरकारने हा अन्यायकारक निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन उभारले जाईल.”

Nitin Raut : काँग्रेसचे दिग्गज नेते नितीन राऊत यांचा फडणवीसांना पाठिंबा !

या आंदोलनात तालुकाध्यक्ष प्रवीण कदम, कार्याध्यक्ष श्रीकृष्ण खराटे, किसान कमिटी तालुका अध्यक्ष नीतीराजसिंह राजपूत, शहराध्यक्ष निना इंगळे, तसेच अभिजीत खाकरे, गजानन मामलकर, संजय किनगे, मिलिंद जयस्वाल, तुळशीराम नाईक, प्रकाश बशी, विकास उजाडे, कैलास गडाख, दिलीप मोरे, भास्कर आघाम, कैलास पाटील, शेख शोहेब, शेख असगर, शेख वसीम चुनेवाले, अमोल शि. देशमुख, मोहसीन खान, भारत मापारी, भागवत किंगे, विनोद वानखेडे, इरफान पठाण, अबीत कुरेशी, रफीक भाई यांच्यासह युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, किसान काँग्रेस आणि फ्रंटल संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.