Laxman Hake : ओबीसींच्या विरोधातून राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न, प्रा. हाके यांचा आरोप

OBC leader alleges that Jarange is leading Maharashtra towards anarchy : जरांगे महाराष्ट्राला अराजकतेकडे नेत आहेत, ओबीसी नेत्यांची टीका

Akola देशात संविधान आणि कायदा हे सर्वोच्च आहेत. आरक्षणाची मागणी करण्याचा अधिकार सर्वांना आहे; मात्र झुंडशाहीच्या बळावर, मुख्यमंत्र्यांना वेठीस धरून किंवा मुंबईतील चाकरमान्यांना अडवून दादागिरी करणे चुकीचे आहे, असे मत ओबीसी नेते प्रा. लक्ष्मणराव हाके यांनी शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

प्रा. हाके यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर तीव्र टीका केली. “बीडमध्ये प्रशासनाला वेठीस धरून दहशत निर्माण केल्यानंतर आता २९ ऑगस्ट रोजी मुंबईत गोंधळ घालण्याचा त्यांचा मनसुबा आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडवून जनतेच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.

Ravindra Chavhan : प्रत्येक जाती-धर्मांमध्ये भाजपचा प्रचार करा, प्रदेशाध्यक्षांचे आवाहन

ते पुढे म्हणाले, “जरांगे यांना लोकशाही मान्य नाही, सर्वोच्च न्यायालयाचा साडे सहाशे पानांचा निकाल मान्य नाही, मागासवर्ग आयोगांचे अहवालही मान्य नाहीत. एवढेच नव्हे तर त्यांच्या मागे कोणाचे पाठबळ आहे, हे सर्वांना ठाऊक आहे.”

हाके यांनी आणखी स्पष्ट केले की, “जरांगे हे राज्यातील ठराविक नेत्यांना लक्ष्य करून शिवीगाळ करत आहेत. ओबीसी समाजाच्या विरोधाची सातत्याने भूमिका घेऊन महाराष्ट्राला अराजकतेकडे नेण्याचा त्यांचा डाव आहे. त्यांना खासदार शरद पवार, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर यांच्यासह काही लोकप्रतिनिधींचे पाठबळ आहे,” असा आरोपही त्यांनी केला.

Vote rigging case : मतदार याद्या तपासण्याच्या राज आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सुचना !

पत्रकार परिषदेला माजी आमदार हरिदास भदे, डॉ. सुरेश बचे, प्रकाश नवलकार, विजय ढेंगे, प्रा. एल. डी. सरोदे, शुभम कवळकार, सुमित नवलकार आदी उपस्थित होते.