Amit Shah : सत्य-असत्याची व्याख्या विरोधकांच्या म्हणण्यावर ठरत नाही !

Shahs first comment on Jagdeep Dhangars resignation : शाह यांचे जगदीप धनगर यांच्याराजीनाम्यावर पहिल्यांदाच भाष्य

New Delhi : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर पहिल्यांदाच भाष्य केले आहे. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळले आणि धनखड यांच्या निर्णयामागील खरी कारणमीमांसा स्पष्ट केली.

अमित शाह म्हणाले की, जगदीप धनखड यांनी त्यांचा कार्यकाळ अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण केला. मात्र त्यांची तब्येत बरी नसल्याने, आरोग्य कारणामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामागे दुसरे कोणतेही कारण नाही. त्यांनी स्पष्ट केले की, उपराष्ट्रपतींनी संविधाना प्रमाणे आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि संवैधानिक मार्गानेच राजीनामा सादर केला.

दरम्यान, विरोधकांकडून जगदीप धनखड नजरकैदेत असल्याचा आरोप होत आहे. यावरही अमित शाह यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, विरोधी पक्ष उगाचच अफवा पसरवत आहेत. सत्य – असत्याची व्याख्या विरोधक काय म्हणतात त्यावर ठरत नाही. त्यांच्या आरोपांमध्ये कोणताही तथ्याधार नाही.

Rohit Pawar : रोहित पवारांनी आणले 12 हजार पानांचे ‘बॅगभर’ पुरावे !

यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवरही जोरदार टीका केली. राहुल गांधींनी एकेकाळी मनमोहन सिंग सरकारने आणलेला अध्यादेश लालूप्रसाद यादव यांना वाचवण्यासाठी फाडला होता. तेव्हा त्यांच्याकडे नैतिकता होती, पण आता ती कुठे गेली? सलग तीन वेळा निवडणूक हरल्यानंतर राजकीय नैतिकतेची अशी थट्टा करायची का?

Sanjay shirsat : पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडी आहे !

नैतिकता ही चंद्र-सूर्यासारखी असते, त्यात बदल होत नाही,” असे शाह म्हणाले. अमित शाह यांच्या या प्रतिक्रियेनंतर जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याबाबत सुरू असलेले राजकीय चर्चांचे वादळ काहीसे शांत होण्याची शक्यता आहे.