Chandrashekhar Bawankule Rallies Behind Ajit Pawar : ते चुकीच्या कामांसाठी फोन करत नाहीत
Nagpur : माढा तालुक्यातील कुर्डू येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महिला आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धमकावले. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापू लागले आहे. विरोधकांनी अजित पवारांवर टिकेची झोड उठवली आहे. महिला आयपीएस अधिकाऱ्याची माफी मागावी, राजीमामा द्यावा, अशा मागण्या होऊ लागल्या आहेत. अशात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आपले सहकारी अजित पवार यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.
यासंदर्भात आज (५ सप्टेंबर) नागपुरात पत्रकारांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अजित दादा चुकीच्या कामांसाठी फोन करत नाहीत. अजित दादांचा हेतू काय होता, हे बघितले पाहिजे. ज्यांनी कुणी ही माहिती अजित दादांना दिली, त्यांच्याकडून काही गल्लत झाली आहे का, हे दादाच सांगू शकतील. साधारणपणे आमच्याकडे कुणीही आलं की आम्ही त्यांच्या कामांसाठी अधिकाऱ्यांना फोन करतो. लोकांचे काम व्हावे या भावनेने फोन करतो. काही अधिकारी चुकीचे काम करत असतील, तर बोलावंही लागतं. याही प्रकरणात अधिकारी नियमात जे असेल, ते करतील.
Janshakti Shetkari Sanghatana : महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावणे दादांना ‘धरण’ सारखे जड जाणार?
मराठा आरक्षणाच्या संदर्भात विचारले असता, कोणत्याही एका समाजाकडून आरक्षण काढून ते दुसऱ्या समाजाला दिलेले नाही. यात काही जण सामाजिक सलोखा बिघडवून संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहेत. ज्या कुठल्यातरी कागदपत्रांवर जुनी नोंद असेल, त्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळणार आहे आणि तसे पुरावे नसल्यास नोंद होणार नाही. यामध्ये कुणीही फार संभ्रम ठेऊ नये.
Reservation controversy : माझी नाराजी मंत्र्यांवर नाही, जीआरमधल्या शब्दांवर
छगन भुजबळ यांनी नाराजी नाही, तर आक्षेप आणि संभ्रम आहेत, ते आम्ही दूर करू. कुठल्या वाक्यांबद्दल संभ्रम आहे, त्यावर चर्चा करू. त्यासाठी मंगळवारी, बुधवारी आम्ही पुन्हा चर्चेला बसणार आहोत. केवळ नोंदणी शोधली म्हणून त्यावर सर्टिफिकेट देणार नाही. अधिकारी नियमाप्रमाणे सही करतील. कुठल्याही कास्ट सर्टीफिकेटला चॅलेंज करता येऊ शकते, असे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.








