Ward formation announced, 87 corporators from 22 wards : प्रभाग रचना जाहीर; वडाळी प्रभाग तीन सदस्यांचा, रुक्मिणीनगर फ्रेजरपुरात जोडला
Amravati बुधवारी रात्री ११ वाजल्यानंतर अमरावती महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली. या रचनेत पाच प्रभागांत बदल करण्यात आले असून, उर्वरित १७ प्रभाग २०१७ च्या निवडणुकीप्रमाणेच ठेवण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे गेली तीन वर्षे निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. विशेष म्हणजे, वडाळी प्रभाग तीन सदस्यांचा करण्यात आला असून रुक्मिणीनगर हा फ्रेजरपुर प्रभागात जोडण्यात आल्याने हा मोठा बदल मानला जात आहे.
अमरावती महापालिका क्षेत्रात एकूण २२ प्रभाग असून, येथून ८७ नगरसेवकांची निवड होणार आहे. त्याशिवाय पाच स्वीकृत सदस्य नामनिर्देशित केले जातील. २०१७ नंतरच्या काळात निवडणुका न झाल्याने इच्छुक उमेदवारांनी या प्रारूप प्रभाग रचनेकडे डोळे लावले होते. नवीन रचनेनुसार प्रभाग क्रमांक ११, १२ आणि १८ मध्ये लक्षणीय बदल झाले आहेत, तर प्रभाग क्रमांक ६ व ७ मध्ये किरकोळ बदल झाले आहेत. आता या प्रारूप रचनेवर किती आक्षेप नोंदविले जातात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Bacchu Kadu : बच्चू कडूंच्या राज्यातील नव्या शिलेदारांची घोषणा!
२०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत ५,७२,४४८ मतदार नोंदवले गेले होते. त्यावेळी मतदानाचा टक्का ५४.५४ इतका होता. सध्या मतदारसंख्या वाढून ती ६,७६,४२८ इतकी झाली आहे. म्हणजेच मागील निवडणुकीपासून १,०३,९८० मतदारांनी वाढ झाली आहे.
या मतदारसंख्येनुसार मतदान केंद्रे निश्चित केली जातील व ईव्हीएमची मागणी करण्यात येईल. ३ सप्टेंबरच्या रात्री प्रभागांची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. या अधिसूचनेवर नागरिकांना १५ सप्टेंबर २०२५ दुपारी ३ वाजेपर्यंत आक्षेप नोंदविता येतील. त्यानंतर २१ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या समक्ष अंतिम सुनावणी होणार आहे.
Pardhi society : यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली राज्य पात्रता परीक्षा (SET)
या पाच प्रभागांत बदल
प्रभाग क्रमांक ६ – विलासनगर-मोरबाग
प्रभाग क्रमांक ७ – जवाहर स्टेडियम प्रभाग
प्रभाग क्रमांक ११ – रुक्मिणीनगर (फ्रेजरपुरास जोडला)
प्रभाग क्रमांक १२ – स्वामी विवेकानंद कॉलनी
प्रभाग क्रमांक १८ – राजापेठ-संत कंवरराम
या प्रभागांच्या हद्दीत बदल करून काही नवीन भाग समाविष्ट करण्यात आल्याचेही कळते.








