Protest in Malkapur over pending crop insurance dues : किसान काँग्रेसची आक्रमक भूमिका; सरकारला तीव्र इशारा
Malkapur तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. शेतकऱ्यांच्या या न्याय्य हक्कासाठी बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत मलकापूर येथे गोधडी मुक्काम आंदोलन सुरू केले. जिल्हाध्यक्ष संभाजी शिर्के यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन उभारण्यात आले.
पंचमुखी हनुमान मंदिरापासून निघालेली रॅली घोषणाबाजी करत कृषी अधिकारी कार्यालयावर पोहोचली. त्यानंतर शेतकऱ्यांनी कार्यालयाबाहेर मुक्काम ठोकत स्पष्ट भूमिका घेतली की, “शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा होईपर्यंत आम्ही उठणार नाही.”
Bacchu Kadu : ‘मर किसान, मर जवान’ हा भाजपचा नारा, बच्चू कडूंची टीका
किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संभाजी शिर्के यांनी शासनाला इशारा दिला की, “शासनाने तात्काळ निर्णय घेतला नाही, तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये.”
या आंदोलनात काँग्रेससोबत राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार जनशक्ती पक्ष, क्रांतिकारी शेतकरी संघटना यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. हाजी रशीद खान जमादार, अॅड. साहेबराव मोरे, मंगलाताई पाटील, संदीप बहुरूपे, अजय टप, निलेश नारखेडे, अनिल भारंबे, गिरीश देशमुख, डॉ. राजेंद्र राऊत यांच्यासह विविध पक्षांचे नेते उपस्थित होते.
P. Sainath : शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा
रात्री उशिरा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्यामकुमार राठी, किसान काँग्रेस प्रदेश सचिव जाबीर भाई, अॅड. जावेद कुरेशी, राष्ट्रवादीचे चेतन जगताप, अजंम कुरेशी, आकाश भोईटे, समीर खान यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा दिला.