Sudhir Mungantiwar : हा रक्ताचा एक थेंब नव्हे, तर देशहितासाठी अर्पण केलेली निष्ठा ! : हा रक्ताचा एक थेंब नव्हे, तर देशहितासाठी अर्पण केलेली निष्ठा !

Service Fortnight Kicks Off in Chandrapur on PM Narendra Modi’s Birthday : चंद्रपूर जिल्ह्यात सेवा पंधरवाड्याला सुरूवात

Chandrapur : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्याला चंद्रपूर जिल्ह्यात राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरूवात झाली. मोदींच्या संकल्पना व मार्गदर्शनातून प्रेरित होऊन चंद्रपूर जिल्हा ग्रामीणच्या २७ मंडळांमध्ये स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले. कार्यकर्त्यांनी गावागावांत स्वच्छतेचा संदेश पोहोचवला. ‘सेवा हीच सर्वोच्च साधना’ हा मोदींनी दिलेला संदेश या उपक्रमातून प्रत्यक्ष साकार झाला, अशी भावना यावेळी आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

ऊर्जानगरमधील कामगार मनोरंजन सभागृहात चंद्रपूर तालुक्यातील भाजपा मंडळ कार्यकारिणीच्या सदस्यांसमवेत आयोजित बैठकीला भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, महामंत्री रामपाल सिंह, दलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष गौतम निमगडे आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अद्वितीय नेतृत्वामुळे भारताने आज जागतिक पातळीवर अभूतपूर्व प्रगती साधली आहे. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व वैज्ञानिक अशा सर्वच क्षेत्रांत नवे शिखर गाठत भारताने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे, असे मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

Sudhir Mungantiwar : कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित मानधन द्या !

 

गोरगरीब, शोषीत, वंचित व दुर्बल घटकांच्या प्रगतीसाठी त्यांनी घेतलेली संकल्पबद्धता आणि अखंडित जनसेवा हीच प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रेरणास्थान ठरत आहे. त्यांच्या कार्यपद्धतीतून जनसेवेला नवे अधिष्ठान लाभले आहे, असेही आमदार मुनगंटीवार यांनी यावेळी नमूद केले.

Sudhir Mungantiwar ; ‘केशवा… माधवा…’ आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या स्वरांनी भारावले भजनी

यावेळी बोलताना आमदार मुनगंटीवार पुढे म्हणाले, रक्तदान, स्वच्छता व सामाजिक उपक्रमांद्वारे कार्यकर्त्यांनी मोदींच्या सेवाभावाची प्रत्यक्ष अमलबजावणी करत समाजकार्याचा नवा आदर्श घालून दिला. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील ऊर्जानगर मंडळात आयोजित भव्य रक्तदान शिबिरात तब्बल २२० रक्तदात्यांनी उत्साहपूर्वक सहभाग नोंदवत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. हे रक्तदान म्हणजे फक्त रक्ताचा थेंब नव्हे, तर देशहितासाठी अर्पण केलेली निष्ठा आहे.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचे प्रयत्न, चंद्रपुरात लवकरच गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र

रक्तदान शिबिराच्या आयोजनासाठी तालुका अध्यक्ष श्रीनिवास जंगम, हनुमान काकडे, विलास टेंभूर्णे, नामदेवराव आसुटकर, शांताराम चौखे, संजय यादव, अमोल जगताप, देवानंद थोरात, सुनील बरीयेकर, फारूख शेख, अशोक गौतम, अनिता भोयर, रोशनी खान, नागेश कडूकर, चंद्रकांत ढोडरे, वासुदेव गावंडे, लक्ष्मी सागर, कैमा रायपुरे, इम्रान पठाण, मनोज मानकर, भारत रायपुरे, मदन चिवडे, हरीश व्यवहारे, भारत काटवले, रंजना किनाके, वनिता आसुटकर, सुरेखा थोरात, मुक्ताताई येरगुडे, भोजराज शिंदे, माला ताई रामटेके, अरविंद बोरकर, प्रवीण चोपकर, मोनिष अस्वानी, अतुल पिल्लरवार, प्रज्योत पुणेकर, नंदू इंगळे, नंदू पटले, विजय झाडे, प्रभाकर ताजणे, जयंत टापरे, जावेद पठाण, गोणी जसपाल, किशोर मांडवकर, गीता वैद्य, जितेंद्र अलेकर, सम्यक कातकर, अर्चित राऊत, गटारी लोणबले, दीपक मडावी, मनीषा थेरे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.