Rohna Barrage Project stalled : फक्त भूलथापांची ओंजळी! आश्वासनांचे पाणी पाजत १६ वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांना ठेवले प्रतीक्षेत

Project-affected people kept waiting for 16 years : विलंबानंतरही रोहना बॅरेज प्रकल्प रखडलेला; संतप्त ग्रामस्थांचा आक्रोश मोर्चा

Akola भूलथापांच्या ओंजळीने आश्वासनांचे पाणी पाजत गेल्या सोळा वर्षांपासून शासन आणि लोकप्रतिनिधी रोहना बॅरेज प्रकल्पातील बाधितांना फसवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पुनर्वसनाचा प्रश्न कायम प्रलंबित असून कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने त्रस्त झालेल्या संतप्त गावकऱ्यांनी उमा नदीच्या पात्रात आक्रोश मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले. तातडीने पुनर्वसन व रखडलेला प्रकल्प पूर्ण करावा, अन्यथा बेमुदत उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे.

रोहना येथील उमा नदीवर बॅरेज प्रकल्प २४ ऑगस्ट २००९ रोजी भूमिपूजनासह मंजूर झाला होता. त्यावेळी बुडीत क्षेत्रात रोहना गाव आल्याने पुनर्वसनाची जबाबदारी शासनावर होती. परंतु गेल्या १६ वर्षांपासून आश्वासनांच्या पलीकडे काहीच झालेले नाही. गावात विकासकामे नाहीत, सुविधा नाहीत, त्यामुळे ग्रामस्थांचा संयम ढासळला आहे. शासनाने दिलेली आश्वासने केवळ कागदावरच राहिली असून गावकऱ्यांच्या पुनर्वसनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

Bacchu Kadu : तहसील कार्यालयात सोयाबीन, संत्रा व केळी फेकून निषेध

२१ सप्टेंबर रोजी रोहना येथील संतप्त ग्रामस्थांनी नदी तीरावर जनआक्रोश मोर्चा काढून शासन व लोकप्रतिनिधींच्या दिरंगाईबद्दल संताप व्यक्त केला. “गावकऱ्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत, अत्यल्प दरात शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी करून शासनाने फसवणूक केली,” असा थेट आरोप नागरिकांनी केला आहे.

District Central Cooperative Bank : भेटवस्तू वाटपावरून संचालक मंडळात आरोप–प्रत्यारोप

दरम्यान, या प्रकल्पातील पोही गावाचे पुनर्वसन देखील रखडले आहे. संपादित जमिनीबाबत उलटसुलट चर्चा सुरू असून या सर्व प्रकरणामुळे रोहना बॅरेज प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. याआधीच या प्रकल्पात ३० ते ३५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती.

Ladki bahan Yojana : लाडकी बहीण योजनेत तब्बल ४९०० कोटींचा भ्रष्टाचार?

शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून घेतल्यानंतरही प्रकल्प रखडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रोजगाराच्या शोधात गोरगरीब ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. “प्रकल्प तातडीने पूर्ण करा व रोहना गावाचे पुनर्वसन तत्काळ करा,” अशी मागणी ग्रामस्थांनी अमरावती पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.