Minister Holds Meeting Regarding University’s Sub-Centre at Akola : मंत्र्यांनी घेतली बैठक; हालचालींना मिळाली गती, विद्यार्थ्यांची होणार सोय
Akola संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र अकोला येथे सुरु करण्यासाठी घेतलेल्या मंत्रालयीन बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठ प्रशासनाला तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
आमदार रणधीर सावरकर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर ही बैठक झाली. सावरकर यांनी मागील अनेक वर्षांपासून अकोला येथे उपकेंद्र स्थापनेसाठी सातत्याने प्रयत्न केले असून, त्यासाठी त्यांनी पत्रव्यवहारासह संसदीय मार्गांचाही अवलंब केला होता.
अमरावती विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात अकोला, बुलढाणा आणि वाशिम हे तीन जिल्हे येतात. या तीन जिल्ह्यांतील सुमारे २२१ (५०%) महाविद्यालये आणि ४५ टक्के विद्यार्थीसंख्या आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील महाविद्यालयाचे अमरावतीपर्यंतचे अंतर तब्बल २०० किलोमीटरपेक्षा अधिक असल्याने विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो, असे आमदार सावरकर यांनी बैठकीत निदर्शनास आणले.
या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अकोला येथे उपकेंद्रासाठी योग्य जागा निश्चित करण्याचे आणि तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले. सुरुवातीस उपकेंद्राकरिता उपलब्ध असलेल्या एखाद्या महाविद्यालयाच्या परिसराचा वापर करण्याचाही पर्याय तपासण्यास सांगण्यात आले.
उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक पातळीवर सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन आमदार रणधीर सावरकर यांनी दिले. उपकेंद्र स्थापनेसाठी विद्यापीठ स्तरावर पुढील कार्यवाही आणि आराखडा तयार करण्यासाठी तीन अधिकाऱ्यांची समिती गठित करण्याचे निर्देशही मंत्री महोदयांनी दिले.
Shivsainiks arrested : गनिमी काव्याने आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना अटक
ही समितीचा प्रारूप अहवाल येत्या मंगळवारपर्यंत उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले. बैठकीला संचालक (उच्च शिक्षण संचालनालय, पुणे) शैलेश देवळणकर ऑनलाइन उपस्थित होते. तसेच विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असणारे, उपसचिव अशोक मांडे आदी अधिकारीही उपस्थित होते.








