Yuvak Congress : युवक काँग्रेसची ‘आय लव्ह आंबेडकर’ मोहीम!

Protests in Amravati Against the Attack on Chief Justice Bhushan Gavai : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या विरोधात अमरावतीत निदर्शने

Amravati सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत शहर युवक काँग्रेसतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी केंद्र आणि राज्य सरकारच्या बहुजनविरोधी व मनुवादी धोरणांचा निषेध करण्यात आला.

शहर युवक काँग्रेसने सांगितले की, या प्रकारामुळे लोकशाही मूल्ये, सामाजिक न्याय आणि समतेच्या तत्त्वांना धक्का बसला असून, देशातील कायदा-सुव्यवस्था आणि सामाजिक सलोख्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute : ‘भारतीय संविधान’, ‘धम्म साहित्य’ ग्रंथांचा बार्टीमध्ये अपमान

या निषेधार्थ युवक काँग्रेसतर्फे संपूर्ण देशभरात ‘आय लव्ह आंबेडकर’ ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नीलेश गुहे यांनी दिली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींवरील हल्ल्याचा सखोल तपास करून दोषींना कडक शिक्षा द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.

List of Excess Rainfall-Affected Talukas Released : जिल्ह्यातील ९ तालुक्यांना लागू हाेणार दुष्काळी सवलती, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार

या आंदोलनात नितीन काळे, विक्की वानखडे, पंकज मांडळे, पंकज शेंडे, अनिकेत क्षीरसागर, मयूर गोतखडे, ऋषिकेश इंगळे, रितेश बोरकर, प्रीतम कुकडे, अमित राऊत, सूरज चव्हाण, सुमित मानकर, सूरज खैरे, चेतन कांडलकर, निशांत पवार, अभिषेक भोसले, अभिषेक आठवले, साहिल वनारे, सम्यक वाकोडे, क्रिश बिसने, यश चक्रे, जय जाधव, सोहम वानखडे, महेश राठोड यासह अनेक युवक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.