Akola BJP : भाजपची भिस्त महिलांवर, जम्बो कार्यकारीणी जाहीर!

New Faces Given Opportunity in District Rural BJP Mahila Morcha : जिल्हा ग्रामीण भाजप महिला मोर्चात नव्या चेहऱ्यांना संधी

Akola भारतीय जनता पार्टी अकोला जिल्हा ग्रामीण महिला मोर्चाच्या जंबो कार्यकारिणीची घोषणा जिल्हाध्यक्षा जयश्री पुंडकर यांनी केली. “सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास” या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारसरणीवर आधारित ही कार्यकारिणी रचना करण्यात आली असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे. संघटन बळकट करण्यासाठी विविध घटकांतील आणि स्तरांवरील महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे.

या कार्यकारिणीच्या रचनेपूर्वी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, पालकमंत्री आकाश फुंडकर, संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे, महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा आ. चित्रा वाघ, तसेच जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, माजी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, किशोर मांगटे पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करण्यात आली.

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंची राजकीय असहायता !

जयश्री पुंडकर यांनी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सल्ला घेऊन आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी ही कार्यकारिणी जाहीर केली. “प्रत्येक गावात आणि नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवायचा आहे,” असे त्यांनी सांगितले.

नवीन कार्यकारिणीत अनुभवी तसेच तरुण कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

सरचिटणीस: मोनाली गावंडे (मूर्तिजापूर), माया धुळे (अकोट)

उपाध्यक्ष: शालिनी हजारे, रेखा गोतरकर, प्रतिभा धर्माळे, छाया मानकर

सचिव: प्रिया महल्ले, मीना नकासकर, सुनिता बगाडे, शितल गावंडे

कोषाध्यक्ष: कल्पना पोहणे

प्रसिद्धीप्रमुख: ज्योती टाले

सोशल मीडिया प्रमुख: गौरी चव्हाण

सदस्य: मनीषा विजेकर, दिपाली तिडके, पल्लवी नेमाडे, चुळसा गाडगे, मंजुषा लोथे, रेखा भाकरे, कुसुम जायले, सिंधू गडम, चंदा आमले, पल्लवी कदम, प्रतिभा येऊन, वंदना लोणकर, अनिता देवीकर, अनिता पवार, रूपल गुजराती, ज्योती ठोकळ, स्वाती गंभीरे.

कायम निमंत्रित सदस्य: सुहासिनी धोत्रे, मंजुषा सावरकर, समीक्षा धोत्रे, नलिनी भारसकळे, नूतन पिंपळे, पुष्पा खंडेलवाल, शिला खेडकर, माधवी कुलकर्णी, सीमा मांगटे, कुसुम भगत, वैशाली निकम.

Local Body Elections : नागपूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची सोडत आज !

कार्यकारिणी जाहीर होताच जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अनेक कार्यकर्त्यांनी जयश्री पुंडकर यांचे फुलांच्या हारांनी स्वागत केले आणि घोषणाबाजीने वातावरण दणाणून टाकले. “ही जंबो कार्यकारिणी पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवेल आणि महिलांना नेतृत्वासाठी प्रोत्साहन देईल,” अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

जयश्री पुंडकर यांनी पुढील काही दिवसांत जिल्ह्यातील प्रमुख गावांमध्ये बैठका घेऊन पक्ष संघटन मजबूत करण्याचे आणि आगामी निवडणुकांत विजयाचे लक्ष्य गाठण्याचे आवाहन केले. अकोला जिल्हा ग्रामीण भाजपा महिला मोर्चाची ही नवीन कार्यकारिणी महिला सक्षमीकरण आणि नेतृत्व विकासाचे उत्तम उदाहरण ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.