Farmers in Trouble : ‘जळाला रे जळाला..’ म्हणत फसवे परिपत्रक जाळले !

Protesters Torch Government Circular Issued on October 9 : ९ ऑक्टोबरला निघालेल्या शासन परिपतिरकाची केली होळी

Nagpur : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देऊ, अशा घोषणा करणाऱ्या महायुती सरकारने शेतकऱ्यांसोबत खेळ केला आहे. घोषणा केलेल्या पॅकेजचे अनुदान एकाही शेतकऱ्याच्या खात्यात अद्याप जमा झाले नाही. यातून शेतकऱ्यांच्या प्रति सरकारची उदासीनता दिसून येते. त्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटनेतर्फे (शरद जोशी) शासनाच्या ९ ऑक्टोबरच्या शासन परिपत्रकाची होळी करण्यात आली.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. श्रीकांत दौलतकार यांच्या नेतृत्वात ‘जळाला रे जळाल्या..’ च्या घोषँणा देत नागपूरच्या व्हेरायटी चौकात हे आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मोठ्या आवेशात ७ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांना ३१ हजार ६२८ कोटींच्या ऐतिहासिक पॅकेजची घोषणा केली. परंतु ही फसव्या ऐतिहासीक सरकारची एतिहासिक लबाडी आहे. हे सरकारने ९ ऑक्टोबर रोजी काढलेल्या शासन निर्णयाद्वारे सिद्ध केले आहे. या पॅकेजनुसार नव्या बाटलीत जुनी दारू, असा खेळ करण्यात आल्याचा आरोप दौलतकार यांनी केला.

Vote theft case : बुलढाण्यात एक लाखाहून अधिक बोगस मतदार!

जुनी २२१५ कोटींची जी मदत जाहीर करण्यात आली होती, तीच तुटपुंजी मदत कायम ठेवण्यात आली आहे. त्यात फक्त दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टर येवढी एकच सुधारणा करण्यात आलेली आहे. म्हणून शेतकरी संघटनेने आज आंदोलन केले.. सरकारने जाहीर केल्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यांत रक्कम जमा करावी व निवडणुकीअगोदर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ करावी.

Vote theft case : आयोगाच्या सर्व्हरवर खासगी व्यक्तीचे नियंत्रण!

सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अन्यथा आम्ही मुख्यमंत्र्यांची दिवाळी साजरी होऊ देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. शासन परिपत्रकाची होळी करण्याच्या या आंदोलनात नागपूरचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण केदार, महिला जिल्हाध्यक्ष सुधा पावडे, नरखेड तालुकाध्यक्ष वसंतराव वैद्य, मुकेश मासुरकर, सुनील चोखारे, प्रशांत नखाते, नरेश निमजे, सुमीत तांदुळकर, विकास गोहाणे, राहुल मनसोड, राज यादव, आनंद निखार आदी सहभागी झाले होते.