Ladki bahan Yojana : ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांच्या हाती फक्त १२ दिवस

The e-KYC process of 1.60 crore women is still incomplete : १.६० कोटी महिलांची e-KYC प्रक्रिया अद्याप अपूर्ण

Mumbai राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी e-KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली असली, तरी या प्रक्रियेची गती अत्यंत मंदावलेली आहे. योजनेच्या सुमारे २.४० कोटी पात्र महिलांपैकी तब्बल १.६० कोटी महिलांची e-KYC प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे १८ नोव्हेंबर २०२५ या अंतिम मुदतीपूर्वी प्रक्रिया पूर्ण न केल्यास लाभार्थ्यांचा पुढील हप्ता थांबण्याची शक्यता आहे.

‘माझी लाडकी बहीण’ योजनेत पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी सरकारने लाभार्थ्यांच्या ओळखीची पडताळणी e-KYC प्रणालीद्वारे करण्याचे ठरवले आहे. मात्र, या प्रक्रियेत तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे अनेक महिलांना अडथळे येत आहेत. आतापर्यंत केवळ ८० लाख महिलांची e-KYC प्रक्रिया पूर्ण झाली असून, उर्वरित १.६० कोटी महिलांनी ती अद्याप केली नाही. यामुळे सरकारसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

Parth Pawar : अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार जमीन घोटाळ्यात अडकले?

 

विशेषतः विधवा आणि घटस्फोटीत महिलांना e-KYC करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कारण e-KYC प्रक्रियेत महिलांना स्वतःच्या आधार कार्डासोबतच पती किंवा वडिलांच्या आधार क्रमांकाची आणि OTP पडताळणीची आवश्यकता असते. ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत, त्यांना हा OTP मिळवणे शक्य नसल्याने त्यांची प्रक्रिया अडकून बसली आहे.

या अडचणींची दखल महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी घेतली असून, “विधवा आणि घटस्फोटीत महिलांच्या अडचणी दूर करण्यासाठी तांत्रिक प्रणालीत सुधारणा आणि पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली.

Local Body Elections : पालिका रणसंग्रामात ‘गठबंधनां’चा गोंधळ!

पूरग्रस्त भागातील महिलांसाठी e-KYC ची अंतिम मुदत १५ दिवसांनी वाढवण्यात आली आहे. मात्र, इतर सर्व लाभार्थ्यांसाठी १८ नोव्हेंबर २०२५ ही अंतिम तारीख कायम आहे. अदिती तटकरे यांनी सर्व पात्र महिलांना आवाहन केले आहे की, “लाडकी बहीण योजनेचा लाभ कायम ठेवायचा असल्यास, अधिकृत संकेतस्थळावर जाऊन वेळेत e-KYC प्रक्रिया पूर्ण करा.”

राज्यातील लाखो महिलांसाठी ही अंतिम संधी असल्याने प्रशासनाने ग्रामपातळीवर जनजागृती मोहीम सुरू केली आहे. मुदतीनंतर प्रक्रिया पूर्ण न केल्यास अनेक बहिणींच्या हातीचा पुढील हप्ता थांबू शकतो.

______