Breaking

Local body elections: मुदतवाढीची शक्यता मावळली, विद्यमान सदस्य निरोप घेण्याच्या तयारीत

Administration preparing for farewell party to the members of Zilla Parishad: प्रशासनाकडून पदाधिकारी व सदस्यांना निरोप देण्यासाठी स्नेह सोहळा

Akola जिल्हा परिषदेतील विद्यमान पदाधिकारी, सदस्यांचा संपुष्टात येणार आहे. प्रशासनाकडून पदाधिकारी व सदस्यांना निरोप देण्यासाठी स्नेह मिलन सोहळा आयोजित केला आहे. यासाठीचे निमंत्रण धाडण्यात येत आहे. हा स्नेह मिलन सोहळा १६ जानेवारीला ११. ३० वाजता अकोला येथील संविधान सभागृहात होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेला आता मुदतवाढ मिळण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. विद्यमान पदाधिकारी निरोप घेण्याच्या तयारीत आहेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी व नंतरही जिल्हा परिषदेला किमान ६ महिन्यांची मुदतवाढ मिळेल. अशी पदाधिकारी, सदस्यांसह काल-परवापर्यंत पदाधिकारी व सदस्यांच्या तोडी मुदतवाढ मिळण्याची भाषा होती. यापूर्वी जिल्हा परिषदेला सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती. त्यामुळे आताही मुदतवाढ मिळण्याचा काही पदाधिकारी, सदस्य दावा करीत होते. परंतु, प्रशासनाकडून आता स्नेह मेळाव्याची तयारी सुरु झाल्याने मुदतवाढ मिळणार नसल्याचे नक्की झाले आहे. जि.प. व पं.स.ची मुदत १७ जोनवारी रोजी संपणार आहे. एकीकडे सदस्य मुदतवाढीसाठी प्रयत्न करीत आहे. दुसरीकडे प्रशासनाकडून पदाधिकारी, सदस्यांना निरोपाची तयारी करण्यात येत आहे.

Nagpur Police नोकरी लागल्यावर लग्नाला नकार, प्रेयसीची आत्महत्या

दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी व नंतरही जिल्हा परिषदेला किमान ६ महिन्यांची मुदतवाढ मिळेल, अशी पदाधिकारी, सदस्यांसह प्रशासनालाही अपेक्षा होती अगदी काल-परवापर्यंत पदाधिकारी व सदस्यांच्या तोंडी मुदतवाढ मिळण्याची भाषा होती. जिल्ह्यातील बहुतांश आमदार हे कधीकाळी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सदस्य होते.

याच ठिकाणी राजकारणाचे धडे घेऊन ते विधानसभेत पोहोचले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लोकापर्यंत सहज पोहोचता येते. त्यामुळे किमान जिल्हा परिषद., पंचायत समिती सदस्य म्हणून तरी जास्तीत-जास्त काळ राहता येईल, असा प्रत्येक सदस्याचा प्रयत्न असतो.

शासनाला मुदतीबाबत केले अवगत

जि. प. प्रशासनाकडून मुदतीबाबत माहिती आयुक्त कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहे. यात जि. प. ची प्रथम सभा १६ जोनवारी २०२० रोजी झाली असून, मुदत १७ जानेवारी २०२५ संपेल असे नमूद केले. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीची पहिली बैठक १६ जानेवारी २०२० रोजी झाली असून, मुदतही १६ जानेवारी २०२५ रोजी संपणार आहे, असे म्हटले आहे.

Poisoning case : आता कामगारांचे कंपनी विरोधात आंदोलन

निवडणुका न झालेल्या ठिकाणी प्रशासक

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा तिढा न्यायालयात असल्याने अकोलासह आठ जि. प. वगळता कार्यकाळ संपलेल्या ठिकाणी निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे तेथे प्रशासकराज आहे. अशातच १४ डिसेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे, धामणगाव, तिवसा या पंचायत समित्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने तेथे संबंधित गटविकास अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे अकोला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मुदतवाढीची शक्यता मावळली आहे.