Congress–Vanchit alliance in Buldhana : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठी राजकीय कलाटणी
Buldhana राज्यभर नगरपरिषद निवडणुकांची धामधूम असताना बुलढाणा जिल्ह्यात आज काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अधिकृत आघाडीची घोषणा केली. धर्मनिरपेक्ष विचारांचा पाया मजबूत ठेवण्यासाठी व जातीयवाद पसरवणाऱ्या शक्तींना रोखण्यासाठी ही आघाडी आवश्यक असल्याचे दोन्ही पक्षांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे आणि वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य व जिल्हा निरीक्षक सविता मुंडे उपस्थित होत्या. दोन्ही पक्षांनी एकमुखाने सांगितले, “जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी आणि धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी ही आघाडी अपरिहार्य.”
Local Body Elections : वंचित बहुजन आघाडीची जिल्हानिहाय वेगळी भूमिका
काँग्रेस महाविकास आघाडीचा घटक पक्ष असल्याचे स्पष्ट करण्यात आले. जिल्हाध्यक्ष बोंद्रे म्हणाले, “सपकाळ साहेबांनी काही दिवसांपूर्वीच बाळासाहेब आंबेडकरांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानुसार नांदेडनंतर आता बुलढाण्यातही काँग्रेस–वंचितची आघाडी स्थिर झाली आहे.” ही आघाडी फक्त नगरपरिषद निवडणुकांपुरती मर्यादित नसून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही कायम राहणार आहे. प्रत्येक शहरात जागावाटप स्थानिक पदाधिकारी ठरवतील, असे स्पष्ट करण्यात आले.
बोंद्रे म्हणाले, “महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला जेवढ्या जागा येतील, त्यापैकी काही जागा वंचितला दिल्या जातील.”
Bihar Elections : अकोल्याच्या पुत्राचा बिहारच्या निवडणुकीत पराभव
काँग्रेस–वंचित एकत्र येताच बुलढाणा जिल्ह्याची राजकीय समीकरणे एकदम बदलली आहेत. नगर परिषद निवडणुकांमध्ये आता थेट मुकाबला ‘‘धर्मनिरपेक्ष आघाडी विरुद्ध उजव्या पंथाच्या पक्षांमध्ये’’ होणार, असे राजकीय अंदाज व्यक्त केले जात आहेत.








