Employees express dissatisfaction over the double standards in the election system : निवडणूक व्यवस्थेतील दुहेरी निकषांवर कर्मचाऱ्यांत नाराजी
Dongaon नगरपालिका निवडणुकीसाठी घेण्यात येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय कर्मचाऱ्यांच्या प्रथम प्रशिक्षणात लोणार व मेहकर तालुक्यातील व्यवस्थापनातील तफावत ठळकपणे समोर आली आहे. लोणारमध्ये मेहकर तालुक्यातील कर्मचाऱ्यांना चहा-बिस्किटांसह जेवणाचीही सोय करण्यात आली असताना, उलट परिस्थिती मेहकर तालुक्यात दिसली. लोणार येथे प्रशिक्षणासाठी गेलेल्या मेहकर तालुक्यातील कर्मचाऱ्यांची मात्र चहा-बिस्किटावरच बोळवण झाली. त्यामुळे अनेकांना उपाशीपोटी परतावे लागले, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
निवडणूक प्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर असते. त्यानुसार १६ नोव्हेंबर रोजी मेहकर नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणात मतदान केंद्रावरील कर्तव्ये, जबाबदाऱ्या तसेच ईव्हीएम हाताळणी अशा दोन टप्प्यांत मार्गदर्शन करण्यात आले.
Political sensitivity : ‘माणुसकीची भिंत’ उभारणाऱ्या डॉ. भुसारींसाठी एकवटले सर्वपक्षीय नेते
लोणारमध्ये प्रशिक्षणास गेलेल्या ३०८ कर्मचाऱ्यांसाठी निवडणूक विभागाने चहा, बिस्किट तसेच जेवणाची उत्तम सोय केली. मात्र मेहकर तालुक्यातील जे कर्मचारी लोणारला प्रशिक्षणासाठी गेले, त्यांना चहा-बिस्किटांनंतर जेवणाची कोणतीही सुविधा पुरविण्यात आली नाही, अशी गंभीर बाब समोर आली आहे.
मेहकर नगरपालिका निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आली, याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी १६ नोव्हेंबर रोजी स्ट्राँग रूम, प्रशिक्षण शिबिर व उमेदवार अर्ज केंद्रांना भेट दिली. तथापि प्रशिक्षणातील सुविधांच्या असमानतेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची कुजबुज सुरू आहे.
मेहकरातील प्रशिक्षण सत्रात निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र जोगी, सहायक अधिकारी नीलेश मडके, न.पा. मुख्याधिकारी राम कापरे व नायब तहसीलदार प्रवीण देशमुख यांनी मतदार केंद्राच्या जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात ईव्हीएम हाताळणीचे प्रशिक्षणही घेण्यात आले. मात्र जेवणासारखी प्राथमिक सुविधा न मिळाल्याने कर्मचाऱ्यांच्या नाराजीचा सूर प्रकर्षाने ऐकू येत आहे.
Criticism of government : हे सरकार सत्याच्या बाजूने नाही, धनंजय मुंडेंना वाचवतय !
लोणारमध्ये उत्तम व्यवस्था आणि मेहकरमध्ये कर्मचाऱ्यांवर झालेल्या ‘उपाशीपोटी’ परिस्थितीमुळे निवडणूक व्यवस्थेतील समन्वय, नियोजन आणि राजकीय हस्तक्षेपाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या तफावतीमुळे आगामी निवडणुकीच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.







