Candidate for the post of councillor killed in an accident : माहेरी जात असताना अलमास परवीन शेख सलीम यांच्यावर काळाचा घाला
Akola अकोट नगर परिषदेत प्रभाग क्र.४ ब मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नगरसेवक पदाच्या उमेदवार अलमास परवीन शेख सलीम या अपघातात ठार झाल्या. ही दुदैवी घटना चांदुर बाजार रोडवर सकाळी सुमारास घडली. मतदानाला तीन दिवस शिल्लक असतांना उमेदवाराचा मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
अकोट शहरातील गणगणे विद्यालय जवळील इस्लाम पुरा भागात वास्तव्यास असलेल्या अलमास परवीन शेख सलिम यांना राकाँच्या अजित पवार गटाकडून प्रभाग ४ ब मध्ये उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. दरम्यान, दुचाकीने शिंदी बु. येथे पती आणि लेकरासह माहेरी जात होत्या. चांदूर बाजार रोडवरील तोडगाव महालक्ष्मी इंडस्ट्री जवळ एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकी एमएच-२७ बिके-४९२० ला जोरदार धडक दिल्याने दुचाकीमागे बसलेल्या अलमास परवीन शेख सलीम यांचा गंभीर दुखापत झाली.
Maharashtra politics : चर्चा झाली आहे, काही गोष्टी ठरल्या आहेत
त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दुर्घटननेतंर घटनास्थळी परतवाडा पोलिसांनी धाव घेतली. अपघाताच्या ठिकाणी असलेल्या नागरिकांच्या मदतीने जखनींना उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे दाखल करण्यात आले. घटनास्थळी आढळलेल्या पिशवीची पोलिसांनी पाहणी केली असता त्यात निवडणूक प्रचाराची काही पत्रके आणि रक्कम आढळून आली होती.








