Repo rate : गृहकर्ज आणि वाहन कर्जधारकांसाठी दिलासादायक निर्णय

 

Reserve Bank reduces repo rate by 0.25% : रिझर्व्ह बँकेने रेपो रेट 0.25% ने कमी करत 5.25% वर आणला

New Delhi : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेत रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात जाहीर केली आहे. या निर्णयानंतर रेपो रेट 5.50 टक्क्यांवरून 5.25 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. सलग तिसऱ्यांदा करण्यात आलेल्या या कपातीमुळे गृहकर्ज आणि वाहन कर्जावर लागू होणारे व्याजदर कमी होण्याची शक्यता वाढली असून EMI मध्ये घट होणार असल्याने कर्जधारकांना दिलासा मिळणार आहे.

अर्थव्यवस्थेचा विकासदर समाधानकारक असून महागाई दर सातत्याने आटोक्यात राहिल्याने व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली. यावर्षी फेब्रुवारी, एप्रिल आणि जूनमध्ये रेपो रेटमध्ये कपात केली गेली होती आणि आता डिसेंबर महिन्यात आणखी 0.25 टक्क्यांची भर पडल्याने या वर्षभरात एकूण 1.25 टक्क्यांनी रेपो रेट कमी झाला आहे.

Local Body Elections : मार खाण्यापासून वाचविणे, हा पळवून लावण्याचा उद्देश

रिझर्व्ह बँकेने व्याजदर कमी केल्यानंतर व्यावसायिक बँकांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध होते आणि त्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होतो. पुढील काही दिवसांत सरकारी आणि खासगी बँका गृहकर्ज व वाहन कर्जावरील व्याजदर 0.25 टक्क्यांनी कमी करण्याची शक्यता असून जर तसे झाले तर लाखो कर्जदारांच्या मासिक हप्त्यांमध्ये घट होऊन आर्थिक ताण कमी होणार आहे.

चलनविषयक धोरणात स्थिर वाढ आणि नियंत्रित महागाई हा दुहेरी उद्देश साध्य करण्यासाठी रेपो रेट कपातीचे धोरण कायम ठेवण्यात येणार असल्याचे संकेत RBI ने दिले आहेत. त्यामुळे नव्याने कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी सध्याचा कालावधी लाभदायी ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

___