Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं, अमरावतीत महायुतीच लढणार

Mahayuti to contest Amravati municipal corporation elections jointly : युती तुटण्याच्या चर्चांवर टाकला पडदा, जागावाटपाचा निर्णय लवकरच

Amravati राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती महानगरपालिका निवडणूक महायुती म्हणूनच लढवली जाईल, असे स्पष्ट केले. जागावाटपाबाबत स्थानिक नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा अंतिम टप्प्यात असून, लवकरच यासंदर्भातील निर्णय जाहीर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अमरावती येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. गेल्या चार दिवसांत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात अमरावती व नागपूर येथे चार बैठका झाल्या होत्या. मात्र, चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असल्याने युतीबाबत अंतिम निर्णय झालेला नव्हता. या पार्श्वभूमीवर अमरावती मनपामध्ये युती होणार की नाही, असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला.

Nagpur crime : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखावर गंभीर गुन्हा

या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, ठरल्याप्रमाणे महायुती होणार आहे. लवकरच कोणता पक्ष किती जागा लढवणार, हे स्पष्ट होईल. दरम्यान, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने ‘एकला चलो रे’ धोरण स्वीकारत युतीत सहभागी न होण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे.

Municipal election : उमेदवारी अर्जासाठी दोनच दिवस उरले तरी युती-आघाडीचा तिढा कायम

त्यामुळे अमरावती महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखालील युवा स्वाभिमान पार्टी महायुती करून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.