Kirit Somaiya’s son gets the Candidature : बीएमसी निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर
Mumbai मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत तेजस्वी घोसाळकर आणि नील सोमय्या यांचा समावेश झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. ही यादी ५५ उमेदवारांची असून पक्षाने जवळपास शंभर जणांना एबी फॉर्मचे वाटप केले असल्याची माहिती मिळाली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर यांना वॉर्ड क्रमांक दोनमधून उमेदवारी देण्यात आली आहे. दहिसर परिसरातील नगरसेविका म्हणून त्यांनी काम केले असून अलीकडेच त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या या निर्णयामुळे शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का बसला होता. आता भाजपने त्यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले आहे.
Shivsena Uddhav Balasaheb Thackeray : रविवारी मध्यरात्री मातोश्रीवर काय घडले? राजकारणात खळबळ
याच यादीत माजी खासदार किरीट सोमय्या यांचे सुपुत्र नील सोमय्या यांनाही संधी देण्यात आली आहे. नील सोमय्या हे तरुण नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या उमेदवारीमुळे भाजपने नव्या पिढीला संधी देण्याचा प्रयत्न केला आहे, असे मानले जात आहे. त्याचबरोबर माजी आमदार राज पुरोहित यांचे पुत्र आकाश पुरोहित यांनाही उमेदवारी मिळाली आहे. या तिन्ही नावांमुळे भाजपने घराणेशाहीचा आरोप टाळत नव्या पिढीला पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे, अशी चर्चा आहे.
भाजपने जाहीर केलेल्या या यादीत एकूण ५५ उमेदवारांचा समावेश आहे. पक्षाने जवळपास शंभर जणांना एबी फॉर्म दिले असून त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ही यादी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने आक्रमक तयारी सुरू केली असून शिवसेना उबाठा गट आणि महाविकास आघाडीसमोर आव्हान उभे केले आहे. विशेष म्हणजे, तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपमध्ये प्रवेश आणि त्यांना तिकीट मिळणे हे ठाकरे गटासाठी मोठे राजकीय नुकसान मानले जात आहे. कारण घोसाळकर या दहिसरमधील लोकप्रिय नगरसेविका असून स्थानिक पातळीवर त्यांचा प्रभाव आहे.
बीएमसी निवडणुकीतील भाजपचे शिलेदार
वॉर्ड क्रमांक – उमेदवार नाव
२ – तेजस्वी घोसाळकर
७ – गणेश खणकर
१० – जितेंद्र पटेल
१३ – राणी त्रिवेदी
१४ – सीमा शिंदे
१५ – जिग्ना शाह
१६ – श्वेता कोरगावकर
१७ – शिल्पा सांगोरे
१९ – दक्षता कवठणकर
२० – बाळा तावडे
२४ – स्वाती जैस्वाल
३७ – प्रतिभा शिंदे
४३ – विनोद मिश्रा
४६ – योगिता कोळी
४७ – तेजिंदर सिंह तिवाणा
५२ – प्रिती साटम
५८ – संदीप पटेल
६० – सायली कुलकर्णी
६३ – रुपेश सावरकर
६८ – रोहन राठोड
६९- सुधा सिंह
७० – अनिश मकवानी
७२ – ममता यादव
७४ – उज्ज्वला मोडक
७६ – प्रकाश मुसळे
८४ – अंजली सामंत
८५ – मिलिंद शिंदे
८७ – महेश पारकर
९७ – हेतल गाला
९९ – जितेंद्र राऊत
१०० – स्वप्ना म्हात्रे
१०३ – हेतल नार्वेेकर
१०४ – प्रकाश गंगाधरे
१०५ – अनिता वैती
१०६ – प्रभाकर शिंदे
१०७ – नील सोमय्या
१०८ – दीपिका घाग
१११ – सारिका पवार
११६ – जागृती पाटील
१२२ – चंदन शर्मा
१२६ – अर्चना भालेराव
१२७- अलका भगत
१३५ – नवनाथ बन
१४४ – बबलू पांचाळ
१५२ – आशा मराठे
१५४ – महादेव शिगवण
१८५ – रवी राजा
१९५ – राजेश कांगणे
१९६ – सोनाली सावंत
२१५ – संतोष ढोले
२१८ – स्नेहल तेंडुलकर
२१९ – सनी सानप
२२१ – आकाश राज पुरोहित
२२६ – मकरंद नार्वेकर
२२७ – हर्षिता नार्वेकर
मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका मानली जाते. त्यामुळे येथे सत्ता मिळवणे हे प्रत्येक पक्षासाठी प्रतिष्ठेचे मानले जाते. शिवसेना अनेक वर्षे महापालिकेवर वर्चस्व राखून होती. मात्र अलीकडील राजकीय घडामोडींमुळे भाजपने आपले बळ वाढवले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने जाहीर केलेली ही यादी महत्त्वाची ठरते. पक्षाने अनुभवी नेत्यांसोबतच नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने निवडणुकीत नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे.








