Local Body Elections : स्वीकृत नगरसेवकपदी भूषण व संतोष मापारींची दाट शक्यता

Bhushan and Santosh Mapari likely to be appointed as co-opted councillors : लोणार नगरपरिषदेत सत्तासमीकरण स्पष्ट; उपाध्यक्षपदी आबेदखान

Lonar लोणार नगरपरिषदेच्या राजकारणात सध्या हालचालींना वेग आला असून, उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदांवर कोणाची वर्णी लागणार याबाबतचे चित्र जवळपास स्पष्ट होत आहे. नगराध्यक्षा सौ. मीराताई भूषण मापारी यांनी ९ जानेवारी रोजी पदग्रहण केल्यानंतर आता पुढील सत्तावाटपाकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

येणाऱ्या दोन ते तीन दिवसांत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदांची प्रक्रिया पूर्ण होणार असून, त्यासाठी पक्षांतर्गत हालचाली शिगेला पोहोचल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे ८ तर अपक्षांचे ५ सदस्य असे एकूण १३ सदस्यांचे संख्याबळ काँग्रेस गटाकडे असल्याने, काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी माजी नगराध्यक्ष भूषण मापारी यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे.

Akola Municipal Corporation election : विकास मंचला इतर पक्षांच्या नगरसेवकांचा बिनशर्त पाठिंबा

दुसरीकडे, शिवसेना (शिंदे गट) ५ व भाजप १ असा एकूण ६ सदस्यांचा गट तयार झाल्याने, या गटाकडून कृबासमितीचे सभापती संतोष उर्फ गोविंद मापारी यांचे नाव स्वीकृत नगरसेवक पदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा आहे. यामुळे या पदासाठी इच्छुक असलेल्या इतरांनी अर्ज मागे घ्यावेत, यासाठी पक्षांतर्गत दबावतंत्र वापरल्याचेही बोलले जात आहे. मात्र, राजकीय आश्वासनांमध्ये अडकलेल्यांची अवस्था सध्या ‘ना घर का ना घाटका’ अशी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

100 crore scam : मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजने अंतर्गत महावितरणमध्ये 100 कोटींचा घोटाळा !

दरम्यान, काँग्रेसकडून उपनगराध्यक्ष पदासाठी आबेदखान यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून, अंतिम घोषणेकडे सर्व राजकीय गोटांचे लक्ष लागले आहे. आगामी निर्णयांमुळे लोणार नगरपरिषदेतील सत्तासमीकरण कसे आकार घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.