Shashikant Khedkar : भाजपा-काँग्रेस एमआयएमसोबत जाऊ शकतात, तर आम्ही शिवसेनेसह का नाही?

When BJP and Congress can join hands with MIM, why shouldn’t we go with Shiv Sena? : दिलीप जाधव यांचा सवाल, साखरखेर्ड्यात शिव-भीम गीतांच्या मंचावर राजकीय खलबते

Sakharkherda नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात नव्या युतीचे वारे वाहात असतानाच, साखरखेर्डा येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. “जर भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस स्वार्थासाठी एमआयएमसारख्या पक्षांसोबत जाऊ शकतात, तर सामाजिक विकासाच्या मुद्द्यावर आम्ही शिवसेनेसह जाण्यात गैर काय?” असा रोखठोक सवाल जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती दिलीप जाधव यांनी उपस्थित केला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आणि माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिव-भीम गीतांच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

दिलीप जाधव यांनी आपल्या भाषणात माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या कार्यपद्धतीचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले की, “डॉ. खेडेकर यांनी आमदार असताना केलेली विकासकामे आजही जनतेच्या मनात घर करून आहेत. जिल्हा परिषदेत काम करताना त्यांची सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती आम्हाला नेहमीच भावली. आतापर्यंत केवळ पक्षीय अडथळ्यांमुळे आम्ही एकत्र येऊ शकलो नाही, परंतु आता वेळ आली आहे की आपण पक्ष बाजूला ठेवून केवळ विकासासाठी एकत्र काम करावे.” या विधानामुळे आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये साखरखेर्डा परिसरात नव्या राजकीय समीकरणांची नांदी लागल्याचे मानले जात आहे.

Ladaki Bahin Yojana : कुटुंबात शासकीय नोकरदार नसतानाही ‘लाडकी बहीण’चे अर्ज नामंजूर; ई-केवायसीतील चुकांमुळे लाभार्थींवर अन्याय

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी मतदारांशी असलेले आपले ऋणानुबंध अधोरेखित केले. “साखरखेर्डा जिल्हा परिषद सर्कलने मला नेहमीच भरभरून प्रेम दिले आहे. भविष्यातही मला तुमच्या सेवेत राहायचे आहे,” असे सांगत त्यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाग्यश्री खेडेकर यांच्या नावाची शिफारस केली. याचवेळी माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी खेडेकर यांची ‘विकासाची ब्ल्यू प्रिंट खिशात ठेवणारे नेतृत्व’ अशी पाठराखण केली, तर बाबूराव मोरे यांनी १८ कोटींच्या ग्रामीण रुग्णालयाचा निधी आणि पाणीपुरवठा योजनांचा दाखला देत खेडेकर हेच विकासाचे खरे शिल्पकार असल्याचे नमूद केले.

KDMC Election 2026 : डोंबिवलीत मनसेच्या बड्या नेत्याने धरलं कमळ; आता ‘मोठा मित्र’ही पक्षप्रवेशाच्या तयारीत?

लोकशाहीर कडूबाई खरात यांच्या शिव-भीम गीतांच्या सुरांनी रंगलेल्या या कार्यक्रमात राजकीय नेत्यांच्या उपस्थितीने एका नव्या आघाडीचे संकेत दिले आहेत. बाबूराव मोरे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला शिवसेना पदाधिकारी, युवासेनेचे कार्यकर्ते आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजीम नवाज राही यांनी आपल्या खास शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. दिलीप जाधव यांच्या या विधानानंतर आता जिल्ह्याच्या राजकारणात नेमकी कोणती उलथापालथ होते, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.