Shocking nature of fake belts common man with one question, Who is in charge : हकालपट्टी नंतरही काळाबाजार सुरूच, धक्कादायक प्रकार सामान्यांचा एकच प्रश्न वरदहस्त कुणाचा?
Chandrapur: चंद्रपूरच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाला असून भाजपाचे चंद्रपूर महानगरचे माजी जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार गंभीर आरोपांच्या विळख्यात अडकले आहेत. एबी फॉर्म गैरप्रकार आणि त्यानंतर झालेल्या हकालपट्टीनंतर प्रकरण शांत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र आता थेट पट्टे वाटपाचे बनावट सर्टिफिकेट, खोटे शिक्के आणि जनतेची उघड फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आल्याने संपूर्ण शहर हादरले आहे.
भाजपाच्या चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीदरम्यान एबी फॉर्मच्या वाटपात मनमानी, गोंधळ आणि गैरप्रकार केल्याचे आरोप झाल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी थेट पत्र काढत सुभाष कासनगोट्टूवार यांची जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली होती. याचवेळी एबी फॉर्म चोरीचेही गंभीर आरोप त्यांच्यावर झाले होते. पक्षाने कठोर भूमिका घेतली, मात्र आता समोर येणारे आरोप हे त्याहूनही अधिक धक्कादायक ठरत आहेत.
Sudhir mungatiwar : आम्हाला राम प्रिय अन् काँग्रेसला ‘रम’ प्रिय
चंद्रपूरमध्ये काही भागांमध्ये पट्टे मिळणार असल्याचे भासवून नागरिकांना बनावट सर्टिफिकेट देण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. या कागदपत्रांवर खोटे शिक्के मारून नागरिकांना फसवले गेले आणि मतदानावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होत आहे. या सगळ्या प्रकारामुळे केवळ राजकीय नव्हे, तर कायदेशीर पातळीवरही मोठा गुन्हा उघड झाल्याचे मानले जात आहे.
हा सगळा गैरप्रकार नेमका कुणाच्या आशीर्वादाने सुरू होता, हा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे. इतकी गंभीर कामे सुरू असताना प्रशासन, पक्ष आणि यंत्रणा गप्प का होत्या, असा सवाल उपस्थित केला जात आहे. चंद्रपूरमध्ये आता एकच चर्चा रंगली आहे, अशा प्रकारे उघडपणे जनतेची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला नेमका कोणाचा वरदहस्त आहे?
इतकेच नव्हे तर सुभाष कासनगोट्टूवार यांनी जमिनींबाबत खोट्या येण्या, बोगस मालकी नोंदी आणि कथित गैरव्यवहार केल्याची कुजबुजही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या प्रकरणाचा लवकरच मोठा पर्दाफाश होणार असल्याची चर्चा असून, आणखी अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जनतेची दिशाभूल करून मतदानावर परिणाम घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुभाष कासनगोट्टूवार यांच्यावर नेमके कोणते गुन्हे दाखल होणार, याकडे आता चंद्रपूरकरांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणावर काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनीही थेट तक्रार दाखल करत जोरदार टीका केली असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
Municipal Election : भाजपचा मोठा भूकंप; माजी महापौरांसह 54 जणांची हकालपट्टी!
एबी फॉर्म प्रकरण, हकालपट्टी, बनावट सर्टिफिकेट, खोटे शिक्के आणि कथित जमीन गैरव्यवहार यामुळे सुभाष कासनगोट्टूवार यांचे नाव पुन्हा वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. आता एकच प्रश्न उपस्थित केला जात आहे तो म्हणजे या सगळ्या प्रकारामागचा खरा सूत्रधार कोण, आणि या प्रकरणाचा पडदा नेमका कधी फाटणार? चंद्रपूरमध्ये उत्तराची प्रतीक्षा अधिक तीव्र होत चालली आहे.








