व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sudhir mungatiwar : आम्हाला राम प्रिय अन् काँग्रेसला ‘रम’ प्रिय

Sudhir mungatiwar : आम्हाला राम प्रिय अन् काँग्रेसला ‘रम’ प्रिय

Sudhir Mungantiwar said, We love Lord Ram, while the Congress loves ‘rum:मुनगंटीवारांनी चंद्रपूर महानगरपालिका प्रचारार्थ आयोजित सभेत दिले वडेट्टीवारांना प्रत्युत्तर

Chandrapur रामायण काल्पनिक आहे. राम हा अस्तित्वातच नव्हता या विचारांचे काँग्रेस नेते आहेत. राम सेतूचे अस्तित्वही त्यांना मान्य नाही आणि रामावर आस्था नाही. ते आधीपासूनच रावणप्रिय आहेत. मात्र आम्ही रामभक्त आहोत. त्यामुळे रामकथा एकणारच. आमच्या वाट्याला याल तर खबरदार. तुमच्यावर रामभक्त भारी पडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांना दिला. यावेळी त्यांनी दारूची दुकाने उघडण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांना चंद्रपूर महापालिकेची सत्ता हवी असल्याचा आरोप करून वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला.

मागील आठ दिवसांपासून चंद्रपूरमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार हे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यावर तोंडसुख घेताना दिसत आहे. त्यांच्या भाषणातील दाखले आणि उदाहरणे सोशल मीडियावर चांगलेच गाजत असून मनोरंजनही करीत आहे. या सर्व भाषणांचा मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, आम्ही रामभक्त आहोत. आमची रामावर आस्था आहे. काँग्रेसचा एकही नेता चंद्रपूर शहराच्या विकासावर बोलताना दिसत नाही. त्यांना चंद्रपूर महापालिका फक्त दारू दुकानांना एनओसी देण्यासाठी पाहिजे आहे.

Sudhir Mungantiwar : श्रीरामांना काल्पनिक म्हणणाऱ्या काँग्रेसच्या विचारांवरच रावणछाया

आमची सत्ता येणारच आहे. यापुढे चंद्रपूर शहरात दारू दुकान आणि एकाही बिअर शॉपिला एनओसी दिली जाणार नाही अशी घोषणाही त्यांनी केली. महात्मा गांधी यांची काँग्रेस केव्हाच संपली आहे. आता त्यांना मत मागण्यासाठी गौतमी पाटील यांना आणावे लागत आहे. याकरिता त्यांनी गौतमी पाटील या ओबीसी असल्याचे सांगून त्यांची जातही बदलून टाकली. एवढी दैना या पक्षाची झाली आहे. गौतमी पाटील एक दिवस येऊन निघून जाईल. या शहराचा विकास कोण करणार? गौतमी पाटील यांना बघून तुम्ही मत देणार का असा सवालही त्यांनी केला.

Sudhir mungantiwar : वडेट्टीवारांचे आरोप म्हणजे भुलभुलय्या!

भाजप आमदारांमधील भांडणामुळे मुख्यमंत्र्यांना आता त्यांना सुधीर कमळ बघ, किशोर कमळ बघ असे म्हणावे लागत असल्याची टीका वडेट्टीवारांनी केली होती. याचाही समाचार त्यांनी घेतला. ते म्हणाले, आम्ही जन्मलो तेव्हापासूनच कमळ बघत आहोत. कमळाला राष्ट्रीय फुल म्हणून काँग्रेसनेच दर्जा दिला आहे. त्यावेळच्या काँग्रेस नेत्यांना भविष्यातील त्यांचे नेते करंटे निघतील आणि त्यांना कमळाकडे बघण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही असे त्यावेळीच उमगले असावे. काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कमळ हाती धरले आहे.आता त्यांच्या समर्थकांची पाळी आहे. त्यामुळे वडेट्टीवारांनी आतापासूनच छगन कमळ बघ, बबन कमळ बघ, मगन कमळ बघ हे धडे गिरवावे असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला. यावेळी त्यांनी वडेट्टीवार यांनी पायजामाची उपमा देऊन चंद्रपूर शहराचा अपमान केला असल्याचेही सांगितले.

error: Content is protected !!