MSRTC Akola : एसटी आगाराच्या दुरवस्थेला अखेर ‘ब्रेक’; १५ कोटींच्या निधीतून कायापालट होणार

akola-st-depot-2-reconstruction-fund-sanctioned-vasant-khandelwal : अनेक वर्षे धूळ खात पडलेल्या प्रस्तावाला अखेर मुहूर्त; परिवहन मंत्र्यांकडून निधीवर शिक्कामोर्तब

Akola राज्यात ‘लाडकी बहीण’ आणि इतर योजनांच्या घोषणांचा पाऊस पडत असताना, अकोल्यातील प्रवाशांच्या पाचवीला पूजलेली एसटी आगाराची दुरवस्था मात्र अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होती. शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही आगार क्रमांक २ ची अवस्था एखाद्या पडक्या वाड्यासारखी झाली होती, ज्यावरून स्थानिक नेतृत्वाच्या कार्यक्षमतेवर आणि प्रशासकीय इच्छाशक्तीवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, आता उशिरा का होईना, या आगाराच्या नशिबी ‘अच्छे दिन’ येणार असल्याचे चिन्हे आहेत.

अकोला आगार क्रमांक २ च्या संपूर्ण पुनर्बांधणीसाठी राज्य सरकारने १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. गेल्या काही वर्षांपासून या आगारातील खड्डे, मोडकळीस आलेली विश्रांतीगृहे आणि अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांसह कर्मचाऱ्यांचेही प्रचंड हाल होत होते. या प्रश्नावर स्थानिक स्तरावर मोठा रोष होता. अलीकडेच परिवहन मंत्र्यांनी या निधीवर स्वाक्षरी केल्याने आगार ‘चकाचक’ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Harshwardhan Sapkal : निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक’; अनेक जिल्हाध्यक्षांची गच्छंती अटळ

या १५ कोटींच्या निधीतून आगारात केवळ डागडुजी न होता, आमूलाग्र बदल सुचवण्यात आले आहेत: पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य होणाऱ्या वाहनतळाचे काँक्रीटीकरण व खडीकरण केले जाणार आहे. आगार व्यवस्थापकांसाठी नवीन निवासस्थाने आणि कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक सुविधांनी सज्ज विश्रांतीगृह बांधले जाईल. संपूर्ण आगाराला भक्कम आवारभिंत उभारून सुरक्षितता सुनिश्चित केली जाणार आहे. रोकड व वितरण शाखेसाठी स्वतंत्र आणि सोयीस्कर इमारत उभी राहणार आहे.

Prashant Dikkar : प्रशांत डिक्करांचा ‘तेल्हाऱ्या’कडे मोर्चा; बुलढाणा सोडून अकोल्यात नशीब अजमावणार?

अकोल्यात आगामी निवडणुकांचे वारे वाहत असताना, या निधीचे श्रेय घेण्याची चढाओढ सुरू झाली आहे. ‘सत्ताधारी पक्षाचे आमदार असतानाही एवढ्या वर्षांपासून आगाराची दुरवस्था का राहिली?’ असा बोचरा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. मात्र, खंडेलवाल यांनी ‘हा पाठपुराव्याचा विजय आहे’, असे म्हणत विरोधकांची धार बोथट करण्याचा प्रयत्न केला आहे.