Bjp maharashtra : भाजपची महाराष्ट्रातील नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा

bjp-maharashtra-padadhikari-list-ravindra-chavan-announcement-krishnaraj-mahadik-navnath-ban : नवनाथ बन मुख्य प्रवक्ते, कृष्णराज महाडिक युवा मोर्चा अध्यक्ष

Mumbai : भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राने राज्यातील नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करत संघटनात्मक पुनर्रचनेला वेग दिला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मुख्य प्रवक्ता, सरचिटणीस, चिटणीस, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष तसेच विविध मोर्चांच्या अध्यक्षांची नावे जाहीर केली. राज्य कार्यकारिणीची पूर्ण घोषणा अद्याप झालेली नसली तरी मर्यादित पदाधिकाऱ्यांची ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मुख्य प्रवक्तेपदी नवनाथ बन यांची नियुक्ती करण्यात आली असून ही त्यांच्यासाठी महत्त्वाची बढती मानली जात आहे. युवा नेतृत्वाला चालना देत भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी कृष्णराज महाडिक यांची निवड करण्यात आली आहे. महिला मोर्चा अध्यक्षपदी चित्रा वाघ तर ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी योगेश टिळेकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. कोषाध्यक्षपदी मिहिर कोटेचा यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

प्रदेश उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोरगे, संजय भेंडे, रामदास कडस, केशव उपाध्ये, गोपीचंद पडळकर, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकूरकर यांची निवड करण्यात आली.

सरचिटणीसपदी निरंजन डावखरे, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश पांडे, सुनील राणे आणि योगेश सागर यांची नियुक्ती झाली आहे. चिटणीसपदी मंगेश चव्हाण, संजय कुटे, परिणय फुके, वर्षा डहाळे, संजय जगताप, अर्चना डेहणकर, रोहिणी नायडू, राम सातपुते, प्रविण घुगे, रेखा कुलकर्णी आणि भैरवी घाक यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

Shegao Politics : पोस्टरवरून ‘तणाव’! शेगावच्या मेळाव्यात भाजपचे दोन्ही नेते धीरगंभीर का?

पत्रकार परिषदेत बोलताना रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, काही महिन्यांपूर्वी केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर निवडणूक आचारसंहिता व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असल्याने पदाधिकारी नियुक्ती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय नेते, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील प्रमुख नेत्यांशी चर्चा करून ही यादी अंतिम करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Sudhir mungantiwar : मुनगंटीवारांमुळे चंद्रपूरकरांना मोठा दिलासा ; पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २००४ घरांसाठी २३० कोटींच्या प्रस्तावाला केंद्राची हिरवी झेंडी

भाजपच्या घटनेनुसार आणि महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन मर्यादित संधी उपलब्ध असल्याचे नमूद करताना, पद न मिळालेल्या कार्यकर्त्यांनाही विविध आयामांतून कामाची संधी दिली जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले. संघटन बळकट करण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक पातळीवर हालचाली वेगवान केल्याचे चित्र आहे.