President-draupadi-murmu-says-India-will-emerge-as-vishwaguru-again : प्रजापिता ब्रह्माकुमारीजच्या आध्यात्मिक केंद्रात ‘राज्यव्यापी अभियाना’चा शुभारंभ
Nagpur पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते भारत विश्वगुरू होणार असल्याचा दावा करीत आहेत. विकसित भारतासाठी सरकारने २०४७ टार्गेट ठेवले आहे. यावर अनेकांच्या मनात शंका कुशंका आहेत. असे असले तरी विश्वास ठेवा भारत हा विश्वगुरु होणारच असल्याचे ठाम मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केले.
नागपूर येथील जामठा स्थित ब्रह्माकुमारीजच्या आध्यात्मिक केंद्रात आयोजित ‘राज्यव्यापी अभियान’ शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. समाजात सौहार्द, एकता आणि मानवी मूल्यांची जपणूक व्हावी, या उद्देशाने हे अभियान राबवण्यात येत आहे. या सोहळ्याला महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, राज्याचे महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ब्रह्माकुमारीजचे अतिरिक्त महासचिव बी. के. मृत्युंजय भाई, राजयोगिनी बी. के. चंद्रिका दीदी आणि नागपूर केंद्राच्या प्रमुख राजयोगिनी बी. के. रजनी दीदी यांची प्रमुख उपस्थिती होती.
https://sattavedh.com/ashish-shelar-ashish-shelar-comment-on-education-department-online-gaming-task-forc
राष्ट्रपती आपल्या भाषणात म्हणाल्या की, भारत हा अध्यात्म, धर्म आणि विश्वासाचा देश आहे. याच अढळ विश्वासाच्या जोरावर आपला देश पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ म्हणून जगात नावाजला जाईल. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी एकमेकांवर विश्वास ठेवून एकजुटीने पुढे जावे. एकेकाळी भारत ‘सोन्याचा धूर’ निघणारा देश म्हणून ओळखला जात होता. त्या काळात माणसामाणसांत कमालीचा विश्वास आणि सहानुभूती होती. तोच वारसा आपल्याला पुन्हा जिवंत करायचा आहे.
BMC budget 2026 : ८०,९५२.५६ कोटींचा मुंबई महापालिका अर्थसंकल्प सादर
कोणी याला ‘विकसित भारत’ म्हणेल तर कोणी ‘डिजिटल युग’, पण या सर्वांचा पाया हा आपल्या संस्कृतीतील धर्म आणि अध्यात्म आहे,असे त्यांनी नमूद केले. येणारा काळ अधिक समृद्ध करण्यासाठी प्रत्येकाने आधी स्वतःमध्ये सकारात्मक बदल करणे गरजेचे आहे. जेव्हा आपण विश्वासाने एक पाऊल टाकू, तेव्हाच देव आणि माणूस जोडले जातील. या राज्यव्यापी अभियानामुळे लोकांच्या मनात विश्वासाची ज्योत प्रज्वलित होईल आणि भारताला विश्वगुरू करण्याच्या संकल्पाला बळ मिळेल, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला.








