Central government takes serious note of the kamleshwar blast : कळमेश्वरमधील घटनेची केंद्र सरकारने घेतली गंभीर दखल
Nagpur कळमेश्वर तालुक्यातील राऊळगाव येथील बारुद बनवणाऱ्या एसएलबी एनर्जी लिमिटेड कंपनीत झालेल्या स्फोटाची दखल आता केंद्र सरकारने घेतली आहे. नागपूर जिल्ह्यात स्फोटकांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये आजवर झालेल्या स्फोटाची माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री मंत्री पियुष गोयल यांनी मागवली आहे. याशिवाय देखभालीकडे आणि कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कारवाईचे आदेश दिले आहे.
राऊळगाव येथे झालेल्या स्फोटात आतापर्यंत १९ कामगारांचा मृत्यू झाला आहे. २३ जण जखमी झाले आहेत. आत्ताच आलेल्या वृत्तीनुसार जखमींपैकी आणखी एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. सध्या १३ कामगार गंभीर जखमी असून ते ७० टक्के भाजल्या गेले आहेत. यापूर्वी डिसेंबर महिन्यात बाजारगाव येथेसुद्धा असाच एक मोठा स्फोट झाला होता. या भीषण स्फोटात सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरापर्यंत कारखान्यावरच्या सिमेंटच्या छपराचे तुकडे उडाले होते.
Uma Bharati: राम बंदिर बांधले मात्र रामराज्याचे काय? उमा भारतींचा सवाल
हा स्फोटाची गंभीर दखल राज्य शासनानेसुद्धा घेतली आहे. आज सोमवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामगार आयुक्तांवर या संपूर्ण विभागांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे अशी सूचना केली. स्फोट होऊ नये आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी या विभागांनी कुठली खबरदारी घेतली होती, काय उपाययोजना केल्या होत्या आणि किती व्हिजिट केल्या याचा अहवाल त्यांनी मागितला.
विभागीय आयुक्त आणि पोलिस उपायुक्तांनी अधिक खोलवर जबाबदारी करून कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. या सर्व घटनेचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. पेसो, डिश, कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांवरसुद्धा गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. या संदर्भात केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनी नागपूर जिल्ह्यातील स्फोटके निर्मिती करणाऱ्या कंपन्या आणि आजवर झालेल्या स्फोटांची माहिती मागितली असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
Nitin Gadkari : नगरसेवकाने काम केलेच पाहिजे, पण तो तुमचा पाळीव प्राणी नाही!
जोपर्यंत एसबीएल कंपनी बंद राहील, तोवर कामगारांना वेतन दिले जाणार आहे. कंपनी पुन्हा सुरू झाल्यानंतर सर्व कामगारांना स्किल डेव्हलपमंट बद्दल प्रशिक्षण दिले जाईल. सध्या या कंपनीत कार्यरत असलेल्या एकाही कामगारांना प्रशिक्षण देण्यात आले नव्हते असेही यावेळी पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
Sbl energy company blast : नागपूर एसबीएल एनर्जी कंपनी स्फोट प्रकरणी मोठी कारवाई
मृतांच्या वारसांना कंपनीकडून ७५ लाख रुपये, राज्य सरकार कडून पाच लाख तर केंद्र सरकार कडून दोन लाख रुपये असे एकूण ८२ लाख रुपये नुकसान भरपाई तर जखमींना २५ लाख रुपये दिले जाणार आहेत. जखमींच्या पुनर्वसनासाठी विशेष योजना आखून पुनर्वसन केले जाईल. घटना कशामुळे झाली याचा प्राथमिक रिपोर्ट आला आहे. त्यात ही घटना निष्काळजीपणामुळे झाल्याचे समोर आले आहे. एका महिन्यात अंतिम रिपोर्ट येईल.
जे जे दोषी आढळतील त्या सर्वांवर कारवाई केली जाईल. सोमवारी सायंकाळपर्यंत सर्व मृतदेहांची डीएनए चाचणी पूर्ण होईल असेही पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.








