Decision-likely-on-BOT-projects-and-water-supply-works : अकोला मनपाच्या स्थायी समितीची सभा १० मार्चला, विरोधकांच्या भूमिकेकडे असणार लक्ष
Akola अकोला महानगरपालिकेची स्थायी समितीची महत्त्वाची सभा मंगळवार, १० मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात होणार आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या अनुसूची ‘ड’ मधील प्रकरण २ चे कलम ३ (अ) अन्वये ही सभा आयोजित करण्यात आली असून, शहरातील काही महत्त्वाच्या प्रशासकीय व विकासकामांवर निर्णय होण्याची शक्यता आहे.
सभेच्या कामकाजाच्या सूचीत मानधन तत्त्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाचा समावेश करण्यात आला आहे. या विषयावर सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
BMC : काँग्रेसमुळे ठाकरे गटाला धक्का; श्रद्धा जाधव यांचा एका मताने पराभव
तसेच अकोला शहरातील नझूल शीट क्र. ३९-बी मधील भूखंड क्र. ८२/१ व ८२/२ या शासनाच्या मालकीच्या जागेवरील आरक्षण क्र. १०० (नाट्यगृह व व्यापारी संकुल) आणि आरक्षण क्र. १९८ (वाहनतळ) या जागांचा बीओटी (BOT) तत्त्वावर विकास करण्याच्या प्रस्तावित प्रकल्पावरही सभेत चर्चा होणार आहे. शहराच्या विकासाशी संबंधित या प्रकल्पावर सभेत राजकीय पातळीवरही चर्चा रंगण्याची शक्यता आहे.
Ajit Pawar plane crash : VSR च्या मालकाला VIP ट्रीटमेंट, मॅच बघायचीही सोय!
याशिवाय १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून औषध खरेदी करण्यासाठी स्थायी समितीची मंजुरी घेण्याचा विषयही सभेत मांडण्यात येणार आहे. तसेच सन २०२५-२६ या वर्षासाठी अकोला शहर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण झोननिहाय तसेच महान जलशुद्धीकरण केंद्र आणि महान ते अकोला मुख्य पाईपलाईनच्या वार्षिक देखभाल व दुरुस्ती कामांसाठी प्राप्त झालेल्या कमी दराच्या निविदेला मान्यता देण्याचा प्रस्तावही चर्चेसाठी ठेवण्यात आला आहे.
शहरातील विकासकामे, पाणीपुरवठा व्यवस्था आणि प्रशासकीय निर्णयांच्या दृष्टीने ही सभा महत्त्वाची मानली जात असून सभेत होणाऱ्या निर्णयांकडे शहरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








