3 held for destroying tiger carcass : तीन आरोपी गजाआड; लोखंडी पेटीत लपविले होते शस्त्र
Bhandara झंजेरिया जंगलातील तीन पुलिया परिसरात सोमवारी वाघिणीच्या मृतदेहाचे चार तुकडे आढळून आले. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. आता या प्रकरणाचे गूढ उलगडले आहे. विजेचा शॉक देऊन या वाघिणीची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिच्या शरीराचे चार तुकडे करण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून, वाघिणीच्या शवाचे तुकडे करण्यासाठी वापरलेली शस्त्रेही जप्त केली आहेत.
Experiments by farmers on raw turmeric : वायगावच्या नामांकित हळदीला प्रक्रिया उद्योगांची प्रतीक्षा
तुमसर वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या झंजेरिया जंगलातील कक्ष क्रमांक ७४ बी आरएफमध्ये असलेल्या तीन पुलिया तलावाजवळ एका वाघिणीचे कापलेल्या अवस्थेतील शव आढळले होते. वनविभाग आणि पोलिसांच्या पथकाने चौकशी करून याप्रकरणी पचारा गावातील राजू तिरथराम वरखडे (५०) याला सर्वप्रथम ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली असता, वाघिणीचे तुकडे करण्यासाठी वापरण्यात आलेली कुन्हाड, कोयता आणि चाकू सापडला.
त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर या गुन्ह्यात सहभागी असलेल्या दुर्गेश तुळशीराम लसुंते (५०), राजेंद्र ऊर्फ बस्तीराम महादेव कुंजाम (५५) या दोन्ही नवेगाव येथील व्यक्तींना ताब्यात घेतले. या दोघांच्या मदतीने आपण वाघिणीची करंट लावून शिकार केली. त्यानंतर तिचे तुकडे केल्याची कबुली आरोपींनी दिली. या तिघांवरही गुन्हे दाखल करून त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. त्यांना ११ जानेवारीपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली.
Wardha Mahavitaran : महावितरणचे दुर्लक्ष; शेतकऱ्यांना होतोय त्रास!
पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी पी. बी. गोफणे, पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे, हवालदार जयसिंग लिल्हारे, डिगंबर पिपरेवार यांनी ही कारवाई केली.
असा आहे घटनाक्रम…
२ जानेवारीच्या रात्री राजू वरखडे याने आपल्या शेतालगत विजेचा सापळा रचला. त्याच रात्री वाघिणीचा त्यात शॉक लागून मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नवेगाव येथील दुर्गेश लसुते आणि राजेंद्र ऊर्फ बस्तीराम कुंजाम या दोघांना राजूने मदतीसाठी बोलावले. दोघांनाही दारू पाजली. त्यानंतर वाघिणीचे तुकडे करून चुंगडीत भरून तलावाजवळ फेकून दिले व तिघेही फरार झाले.
राजूने आपल्या शेतात विजेचा सापळा लावला असला तरी वाघिणीचे तुकडे मात्र लगतच्या शरणागत नामक शेतकऱ्याच्या शेतामध्ये केले. पोलिसांना आणि वनविभागाला त्याच्यावर संशय होता. त्यामुळे पाळत ठेवली होती. श्वानपथकाने त्याच्या घरातील लोखंडी पेटीपर्यंत माग काढला. त्यात दडविलेली शस्त्रे सापडली आणि प्रकार स्पष्ट झाला.
असा अडकला आरोपी जाळ्यात
या वन गुन्ह्यात वनविभागाच्या पथकानेही मोठे परिश्रम घेतले, राजू वरखडेवर संशय आल्याने वनकर्मचाऱ्यांनी त्याच्यावर पाळत ठेवली. उपवन संरक्षक राहुल गवई यांचे मार्गदर्शन यात कामी आल्याचे तुमसरचे वनपरिक्षेत्र अधिकारी छगनलाल रहागंडाले यांनी सांगितले.








