Plastic kites Nylon Manja : ३० हजार प्लास्टिकच्या पतंग जप्त !

30 thousand plastic kites seized Action by the municipality and police : महापालिका, पोलिसांची कारवाई

Nagpur kites : महापालिका आणि पोलिस प्रशासनाने नायलॉन मांजा, प्लास्टिक पतंगींच्या विरोधात धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. प्रशासनाने मैदानांना लक्ष्य केले केले. भरारी पथक मैदानांवर पोहोचताच अनेक पतंगबाजांनी आपल्या चकऱ्या फेकून पळ काढला. या सर्व चकऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ३० हजार प्लास्टिकच्या पतंग पकडण्यात आल्या आहेत. मनपा, पोलिस प्रशासन एकत्रितरित्या या कारवाया करीत आहेत.

नायलॉन मांज्यामुळे जिवाला धोका निर्माण होतो. पशू – पक्षी जखमी होतात. प्लास्टिकच्या पतंगीमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान लक्षात घेता मनपाच्या उपद्रव शोध पथकाने कारवाईची मोहीमच हाती घेतली आहे. शनिवारी शहरातील वेगवेगळ्या मैदानांवर पोहोचलेल्या या चमुने १० चकऱ्या जप्त केल्या. पतंग उडविणारे पळून गेल्याने ते मात्र हातातून निसटून केले. गांधीबाग, नेहरूनगर आणि आशिनगर झोनअंतर्गत या कारवाया करण्यात आल्या असल्याचे वीरसेन तांबे यांनी सांगितले. तांबे यांच्या नेतृत्वात या कारवाया करण्यात येत आहे.

Mahayuti Government: सरकारला दुष्काळ दिसलाच नाही; शेतकरी हवालदिल

आज, रविवार (१२ जानेवारी २०२५) असल्याने मोठ्या प्रमाणात पतंगोत्सव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनपाने विशेष पथक तयार केले आहेत. नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपाकडून देण्यात आला. वाढते अपघात लक्षात घेता इमारतींवर चढून पतंगी उडवू नका, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले.

Dr. Pankaj Bhoyar: लोकसंख्या वाढतेय, पाणी पुरवठ्याचे नियोजन करा

कारवाईची कक्षा वाढवावी
नायलॉन मांजाच्या विक्री व वापरावर जिल्हा प्रशासनाने प्रतिबंध घातल्याने पतंग विक्रीच्या दुकानात तशा सूचनाही लावण्यात आल्या आहेत. इथे नायलॉन मांजा मिळत नसल्याचे हे दुकानदार सांगतात. नियमांचे पालन होत असल्याचे दिसणारे हे चित्र केवळ वरवरचे आहे. नायलॉन मांजा विक्री करणारी सक्रिय टोळीच पडद्याआड काम करत आहेत. बंदी असतानाही हा मांजा शहरात येतो कुठून? असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे. प्रशासनाने आता कारवाईच्या कक्षा अधिक वाढविण्याची गरजही व्यक्त होऊ लागली आहे